Tuesday, June 18, 2024

“फ्लॅट संस्कृतीमध्ये शेजारच्यांचा संबंध नसतो” मिलिंद गवळी यांनी सांगितल्या ‘त्या’ जिव्हाळ्याच्या आठवणी

नेहमीच अभिनेते मिलिंद गवळी हे त्यांच्या पोस्टमधून विविध गोष्टींवर, त्यांच्या आयुष्यतील आठवणींवर, घटनांवर भाष्य करताना दिसतात. मिलिंद गवळी यांची आता त्यांच्या पोस्टमुळे ओळख ही अभिनेते म्हणून कमी आणि लेखक म्हणूनच जास्त होणार असेच सर्वांना वाटत असते. याचे कारण म्हणजे अगदी मोजक्या आणि समर्पक शब्दात ते त्यांच्या भावना उत्तमरीत्या लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात. नकारात्मक भूमिका साकारुनही प्रेक्षक नेहमीच त्यांचा उदो उदो करत त्यांना प्रेम देतात.

आता पुन्हा एकदा मिलिंद हे त्यांच्या एका खूपच सुंदर आणि जिव्हाळ्याच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहे. नुकतेच मिलिंद यांनी त्यांचे घर बदलले आणि ते दुसरीकडे राहायला गेले. आशा एका आपल्या वास्तूतून नव्या वास्तूमध्ये जाण्याचा आनंद नक्कीच त्यांना आहे. मात्र यासोबतच दुःख देखील आहे. ते राहत असलेल्या ठिकाणी त्यांनी एवढ्या वर्षांमध्ये अनेक माणसे जोडली, अनेक आठवणी निर्माण झाल्या. आदी अनेक गोहस्तींवर मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमधून भाष्य केले आहे.

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “Living In Harmony, हार्मनी म्हणजे unity, ऐक्य, एकोपा, स्वरांची संगती आणि नावासारखीच ही हार्मनी नावाची ठाण्यामध्ये बिल्डिंग आहे जिथे आम्ही जवळजवळ तीन वर्ष राहत होतो. २ आठवड्यापूर्वी मी Harmony Signature Towers सोडलं, निघताना आम्ही खूप सुखद आठवणी आणि प्रेम घेऊन निघालो, असं म्हटलं जातं की फ्लॅट संस्कृतीमध्ये शेजारच्यांचा काहीही संबंध नसतो, कोणी कोणाला फारसे ओळखत नसतात, पण इथे तो अपवाद होता, समोरच्या फ्लॅटमध्ये राव फॅमिली राहायची, काही दिवसातच मी त्यांना दिसल्या दिसल्या प्रकाश राव यांनी माझा हात धरला “ तुमने सिरीयल मे मेरी बीवी को बहुत रुलाया है” असं म्हणत मला त्यांच्या घरीच नेलं, आणि त्यांच्या कुटुंबाने आपल्या कुटुंबाचा सदस्यच करून घेतला, त्यांच्या पत्नी विद्याताई South Indian असूनही त्या दररोज सकाळी सहा वाजता “आई कुठे काय करते” बघायच्या, त्यामुळे त्यांचा तसा माझ्याशी परिचय होताच, Indian Oil आणि Bharat Petroleum मधून रिटायर झालेलं हे couple , full of life आहेत, त्यांचा मुलगा popular fitness coach पुनीत , त्याची बायको पल्लवी आणि त्यांची गोड अशी चिमुकली कियू .

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

आमच्या दोघांच्या शेजारचा फ्लॅट कदम फॅमिलीचा, एक दिवस आमच्या मजल्यावर fire Alarm वाजला, आम्ही धावत बाहेर आलो, मजल्यावर धूर बघितला, तर गौरी कदम जी खूप अध्यात्मिक आहे तिने धूप केलं होतं, fire Alarm वाजल्यावर ती सॉरी म्हणत बाहेर आले, त्या दिवसापासून कदम कुटुंबीयांशी कनिष्ठ संबंध निर्मान झाले , लवकरच Indonesia ला राहणारे गौरीचे आई-वडील उज्वलाताई आणि अरुणजी आले, उज्वला ताईंनी तर माझी “तू अशी जवळी रहा “ही सिरीयल पण पूर्णपणे बघितले होती.

मग काय त्यानंतर त्या मजल्यावर कोणाचेही दार कधीही बंदच नसायचं, एकमेकांच्या घरांमध्ये एकमेकांच्या भाज्या ,चटण्या लोणची, पुलाव, इडल्या,दाबेली,कॉफी यांचं येणं जाणं सूरू झालं, उज्वला ताईंच्या आई ज्यावेळेला त्यांच्याकडे राहायला यायच्या, तेव्हा आमच्या गाण्याच्या ही मैफिली सुरू व्हायच्या, कुठलाही सण किंवा महोत्सव साजरा करावा तर पल्लवी राव हिने, खूपच creative, आणि उत्साही आहे ती, Meditation करावं तर गौरी कदम हिच्या guidance ने, अरुण कदम हे इतके मोठे व्यक्ती,त्यांनी अनेक देशांमध्ये बँका आणि कंपनीन्या scratch पासून उभ्या केल्या आहेत , उत्कृष्ट चित्रकार, संगीताची खूप गोडी, Sports . मस्तच गेले ते दिवस. उषा Aunty आणि family, bldg मधल्ये लाहान पोरं, त्यांच्या खूपशा गोड आठवणी घेऊन हार्मोनी सोडून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आहे.”

मिलिंद यांच्या या पोस्टवरच्या कमेंट्स आपण वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की नेटकाऱ्यानी त्यांच्या या नवीन घरासाठी त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या लिखाणाचे कौतुक सुद्धा केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
“जास्तीत जास्त वेळ घालवायचा…सोपं नव्हतं…”; ‘आई’ असलेल्या मधुराणी गोखलेची पोस्ट व्हायरल
आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक, आलिया भट्टने रद्द केला ‘हा’ महत्त्वाचा दौरा

हे देखील वाचा