Monday, June 24, 2024

‘हे विधीलिखित लवकरच प्रत्यक्षात येवो’ म्हणत विजू माने यांनी दिली प्रसाद ओकसोबत नवीन सिनेमाची हिंट?

सध्या मराठीमध्ये अतिशय विविध विषयांवर उत्तम सिनेमे येत आहेत. मराठीमध्ये नेहमीच अतिशय हटक्या विषयांवर सिनेमे बनतात. त्यामुळे मराठी चित्रपटांची भुरळ अनेकांना पडते. मधल्या काही काळापासून मराठीमध्ये अतिशय सुंदर आणि मोठ्या लोकांच्या आयुष्यावर भाष्य करणारे चित्रपट आले आहेत. शिवाय भविष्यात देखील अशा अनेक उत्तम चित्रपटांची लोकांना प्रतीक्षा असणार आहे.

नुकताच मराठीमधील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक असणाऱ्या प्रसाद ओकने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेकांनी त्याला विविध पद्धतीने शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्वांमध्ये दिग्दर्शक विजू माने यांनी दिलेल्या शुभेच्छा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. विजू माने यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये त्यांनी प्रसाद ओकला घेऊन एका नवीन सिनेमाबद्दल हिंट दिली आहे.

विजू माने यांनी प्रसादसोबतचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “तुझ्या हातात असलेल्या सीडी कव्हरवर जो फोटो आहे तो रोल तू करणार आणि तो सिनेमा मी दिग्दर्शित करणार हे विधीलिखित लवकरच प्रत्यक्षात येवो ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. (त्याआधी एक जोरदार मॅच प्रॅक्टिस होईलच)” आता त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून, आगामी काळात प्रसाद ओक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार अशा चर्चा जोरदार व्हायला सुरुवात झाली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रसाद ओकच्या हातात सावरकर यांचा फोटो असलेली सीडी दिसत असून, कदाचित ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले दिसत आहे.

याआधी प्रसाद ओकने शिवसेना नेते असलेल्या आनंद दिघे यांच्यावर आधारित सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. आता लवकरच प्रसाद सावरकरांच्या भूमिकेत दिसला तर त्याच्या फॅन्सला नक्कीच मोठा आनंद होईल हे नक्की.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पैसे कमावण्यासाठी विकायचे चहा, पहिल्या पत्नीसोबत केले होते दुसऱ्यांदा लग्न; वाचा ‘अन्नू कपूर’ यांचा संघर्षमय प्रवास

हंसिका मोटवानी ओटीटीवर तिचे लग्न दाखवण्यासाठी सज्ज, वेब सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा