Thursday, June 13, 2024

अभिनेत्री मानसी नाईकने पहिल्या चित्रपटासाठी घेतले ‘इतके’ कमी मानधन, जाणून घ्या आकडा

‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ हे गाणं वाजलं की आपल्या डोळ्यासमोर येतो एकच चेहरा उभा राहतो तो म्हणजे अभिनेत्री मानसी नाईक हिचा. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील मानसी नाईक हे आता नाव प्रसिद्ध आहे. मालिका, चित्रपटांमधील अभिनयाच्या जोरावर व उत्तम नृत्यशैलीमुळे मानसीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतचं एका मुलाखतीत मानसीने तिच्या पहिल्या मानधनाबाबतचा खुलासा केला आहे.

आज लाखा मध्ये मानधन घेणाऱ्या मानसीला (Mansi Naik) पहिलं फक्त पाचशे रुपये मानधन मिळाले होते. मानसी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केरताना दिसते. मानसी त्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. मानसीता प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत असतात. चाहत्यांना मानसीच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणुन घेण्याची खूप आवड असते.

काही दिवसांपूर्वी मानसी तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. सध्या ती काय करते किंवा तिला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी किती मानधन मिळते याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही ना चला तर मग जाणुन घेऊया. प्रत्येक सेलिब्रिटीला आपल्या पहिल्या मानधनाच खुप कौतुक आणि महत्व असतंच. एका मुलाखतीत मानसी नाईक हिने देखील पहिल्या मानधनाबाबत सांगितले आहे.

एका मुलाखतीत मानसीने तिच्या करिअरबरोबरच तिच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. तुझं पहिलं मानधन किती असा प्रश्न मानसीला विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना मानसी म्हणाली, “मला पहिलं मानधन म्हणून ५०० रुपये मिळाले होते. मी त्यावेळेस गश्मीर महाजनीबरोबर लीड म्हणून डान्स केला होता. त्यावेळेस मी अभिनय क्षेत्रात आले नव्हते.” मानसी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत येते. (Actress Mansi Naik took ‘such’ low salary for her debut film)

अधिक वाचा- 
तब्बल २५ खोल्यांच्या बंगल्यात राहणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने केवळ एका चुकीमुळे बाकीचे आयुष्य घालवले चाळीत
विनोदाचे राजे ‘भगवान दादा’! शूटिंगदरम्यान मारली होती अभिनेत्रीला चापट; फाटली होती डोळ्याची शीर

हे देखील वाचा