पोस्ट शेअर करत करत सिद्धार्थ जाधव झाला भावुक! म्हणतो, “माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सर्वात सुंदर फोटो…”

Marathi actor siddharth jadhav shares a emotional post on social media see photo


सिनेसृष्टीत ‘सिद्धू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ जाधवला कोणत्याही परिचयाची गरज नाही. एक नम्र पार्श्वभूमी आणि सावळे पण भोळे रूप घेऊन सिद्धार्थने चित्रपटसृष्टीत अथक परिश्रम, उत्कटतेने त्याचा मार्ग स्वतः कोरला. सिद्धार्थ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तसेच तो सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असतो.

नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमुळे सिद्धार्थ खूप चर्चेत आला आहे. त्याने इंस्टाग्रामसह ट्विटरवर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सिद्धार्थ सोबत गरीब कुटुंबातील एक लहान मुलगा त्याच्या बाजूला बसलेला दिसत आहे. हा फक्त एक फोटो जरी असला, तरी तो खूप काही बोलून जातो.

आपणा सर्वांना माहित आहे की, सिद्धार्थ एका गरीब कुटुंबातून सुपरस्टार बनला आहे. शेजारी बसलेला लहान मुलगा कदाचित त्याला त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देत असेल. पोस्टमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे कॅप्शन. सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहले की, “माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सर्वात सुंदर फोटो… मी आणि माझं ‘बालपण’…आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो होतो…पण…बोललो काहीच नाही…फक्त अनुभवलं…एकमेकांना… तेजस नेरुरकर मित्रा मी तुझा मनापासून आभारी आहे… आज माझ्या सिद्धूला तू मला भेटवलस…आई, पप्पा, दादा, पिंकी, लव्ह यू…खूप”

ही भावनिक पोस्ट शेअर करून सिद्धार्थने सर्वांनाच भावुक केले. त्याच्या या पोस्टवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पडलाय. फोटोला काही काळातच 40 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांसमवेत अन्य कलाकारांनीही फोटोवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सिद्धार्थने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली. नंतर त्याने ‘अगं बाई अरेच्चा’ द्वारे मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. पुढे, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुय्या’, ‘टाईम प्लीज’, ‘धुरळा’ इत्यादी चित्रपटातील त्याच्या अभिनयाने त्याला प्रत्येक मराठी घरात पोहोचवले.

त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला बॉलिवूडमधून ही ऑफर आल्या. त्याने ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’ आणि ‘सिंबा’ या हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सिंबा’ चित्रपटात त्याने रणवीर सिंगसह पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त सिद्धार्थने मिथुन चक्रवर्ती अभिनित बंगाली चित्रपटातही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्ड आणि ब्युटीफुल! जॅकलिनच्या टाॅपलेस फोटोचा सोशलवर राडा; काही मिनिटात लाखो लाईक्स

-बाई, किती ती घाई..! जान्हवी कपूरने थेट गाडीतच बदलले कपडे; कपडे बदलतानाचे फोटो व्हायरल

-‘भाईजान’ सलमान खानने शब्द पाळला; ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर केलं रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.