बाई, किती ती घाई..! जान्हवी कपूरने थेट गाडीतच बदलले कपडे; कपडे बदलतानाचे फोटो व्हायरल

Actress Janhvi Kapoor change her dress in car, photo viral on Instagram


अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. प्रमोशनमध्ये ती कोणतीच कसर सोडत नाही. या दिवसात ती अनेक ठिकाणी तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असते. यामध्ये असं झालंय की, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तिला तिचा ड्रेस आणि लूक चेंज करायला वेळ देखील मिळत नाही. त्यामुळे तिला कपडे तिच्या गाडीमध्येच बदलावे लागत आहेत. तिला तिचा लूक चेंज करायला खूपच मेहनत घ्यावी लागत आहे. तिचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटो असा आहे की, ज्यात ती गाडीमध्ये कपडे बदलत आहे. पहिल्या फोटोत तिने एक स्ट्रेपलेस टॉप घातला आहे. दुसऱ्या फोटोत टॉपसोबत तिने मिनी स्कर्ट घातला आहे. तिसऱ्या फोटोत ती कपडे बदलताना दिसत आहे, तर शेवटच्या फोटोत ती प्लेनच्या सीटवर बसली असून थकलेली दिसत आहे.

तिने या फोटोसोबत असे कॅप्शन लिहले आहे की, “हा एक रिलॅक्स्ड दिवस होता.” या सोबतच तिने अपसाईड डाऊन स्माईलिंगचा देखील वापर केला आहे. तिच्या सगळ्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूपच आवडले आहेत.

जान्हवी सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. तिचे चाहते ती दिसता क्षणीच तिच्या भोवती फोटो काढण्यासाठी घोळका करत असतात. मागे एकदा जान्हवी एअरपोर्टवर असताना तिचा एक फॅन तिच्याकडे सेल्फी काढण्यासाठी आला होता. परंतु त्याने मास्क न घातल्याने जान्हवीने मॅनेजरला सांगून त्याला बाजूला जायला सांगितले. परंतु तिने त्याला सेल्फी दिला. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.

जान्हवी कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रुही’ हा चित्रपट 11 मार्च चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे. कोरोना नंतर मोठ्या बजेटचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.०६ कोटी रुपयांची कमाईदेखील केली आहे. या चित्रपटात तिच्याव्यतिरिक्त राजकुमार राव आणि वरुण शर्मादेखील आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जान्हवीच्या मॅनेजरने केला चाहत्यासोबत गैरव्यवहार; पाहून जान्हवीने केले असे काही, व्हिडिओ व्हायरल

-सांगलीची मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली हटके अंदाजात! चाहत्यांकडून फोटोंना जबरदस्त पसंती

-‘भाईजान’ सलमान खानने शब्द पाळला; ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर केलं रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.