Thursday, June 13, 2024

‘गदर 2’ची कमाई पाहून हेमा मालिनी झाल्या सनीवर फिदा; म्हणाल्या, ‘मी सनीला…’

सनी देओलच्या ‘गदर 2‘ चित्रपटाने चांगलाच धूमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी झ्याल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. ‘गदर 2‘ने भल्याभल्याना वेड लावले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटावर आता प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी गदर 2 च्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना हेमा मालिनी ( Hema Malini ) यांनी सनीला (Sunny Deol ) एक सल्ला देखील दिला आहे. हेमा मालिनी गदर 2 च्या यशाबद्दल मनमोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाला की, ‘गदर 2’ हे मोठे यश आहे. कारण लोकांना सनी खूप आवडतो. अनेकांना तो हवा आहे. मी त्याला म्हणायचे की, आता तुला सर्वोत्तम गोष्ट करायची आहे आणि ती तुला करावीच लागणार आहे. तेव्हा तो म्हणायचा की, “मी करेन. ”

हेमा मालिनी पुढे बोलताना म्हणाल्या की, “तुम्हाला माहित आहे की, तो खूप गोंडस आहे. त्याच्या प्रत्येक सीनबद्दल मी खूप उत्सुक आहे. त्याचे सर्वजण खूप कौतुक करत आहेत. ही गोष्प खूप चांगली आहे. प्रत्येक सीन खूप छान आहे.” याआधी हेमा मालिनी यांची मुलगी ईशा आणि आहानाही सनी देओलला सपोर्ट करण्यासाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचल्या होत्या.

इशा आणि अहाना सनी देओल आणि बॉबी देओलसोबत सार्वजनिक कार्यक्रमात दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. याबद्दल बोलताना हेमा म्हणाली, “आम्ही सोबत आहोत, नेहमीच एकत्र आहोत. आम्ही एकमेकांना नेहमीच साथ देतो, कोणतीही अडचण आली तरी आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो. तो आनंदी आहे आणि मी देखील आनंदी आहे.” त्यांंच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (After seeing the earnings of ‘Gadar 2’, Hema Malini became angry with Sunny)

अधिक वाचा- 
बापरे! पाकिस्तानच्या तुरुंगात होता ‘हा’ अभिनेता, 225 सिनेमे करुनही नशिबी दारिद्र्यच
थिएटरमध्ये झाली अनुपम खेर आणि किरण खेरची मैत्री, पुढे आयुष्यभरासाठी बांधली रेशीमगाठ

हे देखील वाचा