Wednesday, June 26, 2024

दोन-दोन वेळा संसार थाटणारे मराठी कलाकार आहेत तरी कोण?

लग्न ही प्रत्येक व्यक्तीसाठी किती महत्त्वाची गोष्ट असते नाही का. जी व्यक्ती आपल्याला आवडते तिच्याबरोबर आपण पुढचं आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा २-२ लग्न करते, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात. असंच काहीसं सिनेसृष्टीतील कलाकारांचंंही आहे. आज आपण या व्हिडिओतून मराठी सिनेसृष्टीतील असे काही कलाकार पाहणार आहोत, ज्यांनी खऱ्या आयुष्यातही एक नाही, तर २-२ वेळा संसार थाटलाय.

यादीतील पहिलंच नाव सध्या तसं चर्चेतलंच. कारण ही अभिनेत्री बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात झळकली होती. ही अभिनेत्री म्हणजेच स्नेहा वाघ. (sneha wagh) स्नेहानं दोन लग्न केली होती. २००७ मध्ये प्रसिद्ध अभिनेता आविष्कार दारव्हेकरसोबत संसार थाटला होता. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलंच नाही. यानंतर स्नेहानं दुसरं लग्न २०१५ साली केलं होतं. तिच्या दुसऱ्या पतीचं नाव अनुराग सोलंकी. अनुराग हा इंटेरिअर डिझायनर आहे. अवघ्या ८ महिन्यांतच त्यांचं नातं तुटलं होतं. स्नेहानं आपल्या दोन्ही पतींकडून आपला छळ झाल्याचं सांगितलं होतं.

पुढचं नाव आहे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवलेले अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर.. (mahesh manjrekar) ‘बिग बॉस मराठी’मध्ये स्पर्धकांची हजेरी घेणाऱ्या महेश मांजरेकरांनीही दोन लग्न केली आहेत. अभिनेत्री मेधा मांजरेकर या त्यांच्या दुसऱ्या पत्नी. मेधा आणि महेश यांना एक मुलगी आहे. तिचं नाव सई आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव दीपा मेहता असून त्या एक कॉस्च्युम डिझायनर आहेत. त्यांचा घटस्फोट झालाय. त्यांच्याकडून महेश मांजरेकरांना अश्वमी आणि सत्या ही दोन मुलं आहेत. ही दोन्ही मुलं महेश मांजरेकरांसोबतच राहतात.

‘दुनियादारी’, ‘तूहिरे’, ‘प्यार वाली लव्हस्टोरी’ यांसारख्या रोमँटिक सिनेमे देणारे दिग्दर्शक संजय जाधवही (sanjay jadhav) दोनदा बोहल्यावर चढलेत. त्यांचं पहिलं लग्न हे आक्कासाहेब म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकरसोबत केलं होतं. मात्र, त्यांचं नातं तुटलं. त्या दोघांनाही दोन मुली आहेत. त्यांचं नाव आहेत द्रिष्टी आणि मृणाल. द्रिष्टी ही डान्सर आहे, तर मृणाल ही बालकलाकार आहे. नंतर संजय जाधवांनी प्रोमिता जाधव यांच्याशी दुसरं लग्न केलं. प्रोमिता या कॉस्च्युम डिझायनर आहेत.

विनोदाचा बादशाह अशी ज्याची ओळख, ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. (laxmikant berde) लक्ष्मीकांत यांचं पहिलं लग्न १९८५ साली रूही बेर्डेसोबत झालं होतं. त्यानंतर त्यांचं नातं १९९८ साली तुटलं. यानंतर त्यांनी त्याच वर्षी प्रिया बेर्डेसोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. प्रिया या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. दोघांनीही एकत्र अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलंय. त्यांना स्वानंदी आणि अभिनय ही दोन मुले आहेत. अभिनयही मराठी सिनेमात झळकलाय.

प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक हेदेखील लग्नाच्या बेडीत एकदा नाही, तर दोनदा अडकले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं ना पद्मश्री पाठक असून त्यांना गिरीजा ही मुलगीही आहे. गिरीजादेखील मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गिरीश आणि पद्मश्री यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर गिरीश यांनी २३ मार्च, २००८ रोजी पल्लवी यांच्यासोबत संसार थाटला. गिरीश आणि पल्लवी यांना दुर्गा नावाची मुलगी आहे. पद्मश्री पाठक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांना गिरीजा ही मुलगी झाली. परंतु काही वर्षानंतर गिरीश आणि पद्मश्री यांनी घटस्फोट घेतला. गिरीजा देखील आज मराठी सिनेसृष्टीतल प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यानंतप २३ मार्च २००८ रोजी गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दुर्गा नावाची मुलगी आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. (swapnil joshi) बऱ्याच चाहत्यांना कदाचित माहिती नसेल की, स्वप्नील हादेखील दोन वेळा लग्नबंधनात अडकलाय. त्याचं पहिलं लग्न हे २००५ साली अपर्णा जोशीसोबत झालं होतं. विशेष म्हणजे, त्यांचं हे लव्हमॅरेज होतं. पण २००९ मध्ये हे नातंही तुटलं. त्यानंतर स्वप्नील जोशीनं २०११ साली लीना आराध्येसोबत दुसरं लग्न केलं. हे त्याचं अरेंज मॅरेज बरं का. लीना ही डेंटिस्ट आहे. स्वप्नील आणि लीना यांना मायरा आणि राघव ही २ मुलं आहेत.

‘मैंने प्यार किया’ सिनेमा पाहिला असेल, तर तुम्हाला माधुरीच्या बहिणीचा रोल साकारणारी अभिनेत्रीही आठवतच असेल. ती म्हणजे रेणुका शहाणे. (renuka shahane) रेणुकाची दोन लग्नं झालीत. तिचं पहिलं लग्न हे लेखक- दिग्दर्शक विजय केंकरेसोबत झालं होतं. पण त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. यानंतर तिनं प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणासोबत २००१ साली संसार थाटला. त्यांना शौर्यमान आणि सत्येंद्र ही दोन मुलं आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अनुषा अन् करणचं ३ वर्षांचं गोड नातं ‘या’ कारणामुळे एका झटक्यात झालं कडू

कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा’ला टक्कर देणारे टॉलिवूड सिनेमे

अय्यो! दीपिकाची इच्छा पूर्ण करणे रणवीरच्या अंगाशी; बेअर ग्रिल्स म्हणाला, ‘तू आता अंडरवेअर काढ’

हे देखील वाचा