झी मराठी या वाहिनीवरील एक मालिका चांगलीच गाजली होती. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले होते. ती मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ होय. या मालिकेने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. यासोबत मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या पात्रांना देखील खूप चांगली ओळख मिळाली. राणाचा कोल्हापूरचा रांगडा बाज आणि पाठकबाईंचा शिस्तप्रिय अंदाज प्रेक्षकांना भावाला होता. या मालिकेत ही पात्रं हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी निभावली होती. दोघांच्या अभिनयाला देखील खूप चांगली दाद मिळाली होती. या मालिकेने बऱ्याच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. परंतु त्यांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्हीही कलाकार आजही प्रेक्षकांशी जोडून आहेत. अशातच अक्षयाचे काही फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.
अक्षयाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने हलक्या हिरव्या रंगाची साडी स्टायलिश साडी नेसलेली आहे. यावर तिने डिझायनर गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. गळ्यात हिरव्या रंगाचा नेकलेस आणि मॅचिंग ईअरिंग घातले आहेत. तसेच केसात गुलाबी रंगाची गुलाबाची फुले लावली आहेत. बिंदी, कपाळी चंद्राची कोर, नाकात नथ असा सगळा साजशृंगार केला आहे. फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Marathi actress Akshya deodhar share her photos on social media)
तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते कमेंट करून तिच्या या नव्या लूकचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “जेव्हा मराठीमध्ये बाहुबलीसारखे चित्रपट बनवतील, तेव्हा त्या चित्रपटातील देवसेना असशील.” आणखी एक चाहत्याने “देवसेना,” अशी कमेंट केली आहे. आणखी एका चाहत्याने “स्वर्गातून जणू आली अप्सरा,” अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अक्षयाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि याच मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रिया बापटने केला लाडू बनवतानाचा व्हिडिओ शेअर; ‘हा’ कलाकार म्हणाला, ‘मला पण पाहिजे’
-‘आली गौराई अंगणी…’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री समिधाने सुंदर फोटो केले शेअर; एकदा पाहाच










