Monday, June 24, 2024

अन्विता फलटणकरच्या नवीन व्हिडिओवर नेटकरी फिदा; कमेंट करत चाहता म्हणाला, ‘एक्स्प्रेशनची राणी, महाराणी’

‘मम्मीची एक फाईट आणि वातावरण टाईट’ हा डायलॉग आठवतोय ना? का नाही आठवणार!‌ २०१९ मधील ‘गर्ल्स’ चित्रपटातील या डायलॉगने सर्वांना वेड लावले होते. यासोबत वेड लावले या चित्रपटातील मती, मॅगी आणि रुमीने. यातील बिनधास्त, बेधडक आणि वेळ आल्यावर डायरेक्ट हातापायीवर येणारी रुमी म्हणजे अन्विता फलटणकर होय. याच चित्रपटातून एक गुबगुबीत, क्यूट अभिनेत्री सर्वांसमोर आली. सध्या अन्विता जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.

अन्विताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घालून बसलेली आहे. तिने गळ्यात नेकलेस आणि झुमके घातले आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘मन केसर केसर’ हे गाणे लागले आहे. या गाण्यावर खूप सुंदर हावभाव करताना दिसत आहे. (Marathi actress Anvita faltankar share her video on social media)

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “एक्स्प्रेशनची राणी, महाराणी.” यासोबत एका चाहत्याने कमाल अशी कमेंट केली आहे.

अन्विता सध्या झी मीडियावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेत तिच्यासोबत शाल्व किंजवडेकर हा मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ओम आणि स्वीटू हे दोघे झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय जोडपे आहेत. प्रेक्षक त्यांना खूप प्रेम देतात. अन्विताने या आधी ‘गर्ल्स’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी प्रिन्सेस दिसतेय संस्कृती बालगुडे, ग्लॅमरस अदावर तुम्हीही व्हाल फिदा

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

-बाबांची आठवण आणि संस्कारांची शिदोरी! तेजस्विनीने वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा

हे देखील वाचा