Tuesday, June 25, 2024

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी प्रिन्सेस दिसतेय संस्कृती बालगुडे, ग्लॅमरस अदावर तुम्हीही व्हाल फिदा

सगळेच चित्रपट न स्वीकारता अगदी निवडक चित्रपट करणारी अभिनेत्री म्हणजेच मराठमोळी संस्कृती बालगुडे होय. तिने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. कितीही अवघड भूमिका असुद्या, संस्कृती तिला अगदी सहजतेने पार पाडते. तिच्या याच अंदाजामुळे तिचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी ती दरदिवशी तिचे फोटोशूट, नाहीतर मग व्हिडिओ शेअर करते. चाहत्यांकडूनही तिच्या पोस्टला खूप प्रेम मिळते.

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रिय राहणे पसंत करते. अलीकडेच तिने शेअर केलेले फोटो आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. वास्तविक हे तिचे लेटेस्ट फोटोशूट आहे, जे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. (sanskruti balgude shared her glamorous photoshoot in blue dress)

संस्कृतीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये, तिची अप्रतिम सुंदरता पाहायला मिळत आहे. यात तिने निळ्या रंगाचा लॉंग ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. यावर डायमंड नेकलेस घालून, संस्कृतीने आपला हा स्टायलिश लूक पूर्ण केला आहे. सोबतच तिने मेसी बन बांधला आहे. एकंदरीत या लूकमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसतेय.

यातील तिच्या अदा पाहून, कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. संस्कृतीच्या सुंदरतेचे दर्शन घडवून देणारे हे फोटो बघता बघताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेहमीप्रमाणे अभिनेत्रीचं हे फोटोशूटही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. यामुळेच फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत, अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा