Friday, July 5, 2024

लाखो हृदये घायाळ करणाऱ्या भाग्यश्री मोटेला ‘या’ व्यक्तीने केलंय घायाळ, स्वतः अभिनेत्रीने दिलीये प्रेमाची कबुली

 भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) ही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या भाग्यश्रीच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मराठी सिने जगतातील या लोकप्रिय अभिनेत्रीने आपल्या या व्हायरल पोस्टमध्ये प्रेमाची कबुली दिली आहे. इतकेच नव्हेतर भाग्यश्रीने आपल्या प्रियकरासोबतचा फोटोही शेअर केला आहे. जो  सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या सोज्वळ सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने सिने जगतात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. भाग्यश्रीने अनेक हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्य सिने जगतात काम केले आहे. सध्या भाग्यश्रीची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली दिली आहे. सोबतच प्रियकरासोबतचा एक रोमॅंटिक फोटोही शेअर केला आहे. भाग्यश्रीच्या प्रियकराचे नाव विजय पालांडे असून तो मेकअप डिजायनर आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंवरुन भाग्यश्रीने दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत भाग्यश्रीने ‘Mine’ असा गोड कॅप्शन दिला आहे. भाग्यश्रीच्या या फोटोवर फक्त चाहतेच नव्हेतर मराठी चित्रपट जगतातील अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्री भाग्यश्रीचे संपूर्ण बालपण पुण्यात गेले असून तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. भाग्यश्रीने ‘देवों के देव’ ‘महादेव’, ‘सिया के राम’, ‘जोधा अकबर’ अशा अनेक हिंदी तर देवयानी, प्रेम हे अशा मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. पाटील, मुंबई मिरर, माझ्या बायकोचा प्रियकर हे भाग्यश्रीचे गाजलेले चित्रपट आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा