Friday, April 19, 2024

Rajit Kapur Birthday: कधी महात्मा गांधीच्या तर कधी गुप्तहेराच्या भूमिकेत अभिनेत्याने दाखवली पडद्यावर कमाल

रजित कपूर (Rajit Kapur) हे छोट्या आणि मोठ्या पडद्याच्या दुनियेतील एक मोठे नाव आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मनोरंजन जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अनेक प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये काम केले आहे तसेच  बॉलीवूड चित्रपटांमध्येही दमदार  भूमिका केल्या आहेत. अभिनयासोबतच रजत दिग्दर्शनाच्या जगातही आपली छाप पाडताना दिसत आहेत. दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी रंगभूमीवरही भरपूर काम केले आहे. रविवार (२२ मे) त्यांचा वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दितील गाजलेल्या भूमिकांबद्दल. 

अभिनेते रजित कपूर यांचा जन्म 22 मे 1960 रोजी अमृतसर येथे झाला होता. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक आव्हानात्मक भूमिका खूप छान साकारल्या आहेत. कधी ते पडद्यावर गांधीच्या भूमिकेत आला तर कधी डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षीच्या भूमिकेत. पाहूया त्यांच्या अशाच प्रसिद्ध भूमिका.

‘ब्योमकेश बख्शी’ (1993) –  रजित कपूर यांनी १९९३ मध्ये प्रसिद्ध टिव्ही मालिका ‘ब्योमकेश बख्शी’ मध्ये प्रसिद्ध बंंगाली गुप्तहेर ‘ब्योमकेश बख्शी’ यांचू भूमिका साकारली होती. ब्योमकेश बख्शी हे लोकप्रिय लेखक शरदेंदु बंद्योपाध्याय यांनी रचलेली भूमिका होती. हे एक काल्पनिक भूमिका होती. मात्र रजित यांच्या अभिनयाने या पात्राला पडद्यावर पुन्हा जिवंत केले.

‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (1996) –  रजित कपूर यांनी 1996 मध्ये आलेल्या ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची निर्मिती भारत-दक्षिण आफ्रिका यांनी संयुक्तपणे केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. चित्रपटात रजित कपूर यांच्याशिवाय पल्लवी जोशीने कस्तुरबा गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी रजित कपूर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रजित कपूर हे महात्मा गांधी यांची रुपेरी पडद्यावर भूमिका करणारे पहिले भारतीय आहेत.

वेब सीरिज ‘रॉकेट बॉय’ (2022) –  ही वेब सिरीज होमी जहांगीर भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांची प्रेरणादायी कथा आहे. चाळीस-चाळीस मिनिटांच्या या मालिकेत आठ भाग आहेत. या मालिकेत रजित कपूर यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट – आर. माधवन दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर 19 मे रोजी 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात झाला. हा भारतीय शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात रजित कपूर विक्रम साराभाईच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 1 जून 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आर. माधवनने डॉ नंबी नारायणन यांची भूमिका साकारली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा