Wednesday, December 6, 2023

बॉलिवूडवर कोसळला दुःखाचा डोंगर; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारा निर्माता काळाच्या पडद्याआड

बॉलिवूड चित्रपट जगतासाठी एक धक्कादायक  बातमी समोर आली असून हिंदी सिनेजगताला अनेक हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध चित्रपट निर्माते मोहम्मद रियाझ (mohammad riaz) यांचे शनिवारी सायंकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. या बातमीने सिनेजगताला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद रियाझ यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

कोलकाता येथील मूळचे मोहम्मद रियाझ यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक आणि कानपूरचे मूळ मुशीर आलम यांच्यासमवेत मुशीर रियाझ प्रॉडक्शन ही चित्रपट निर्मिती कंपनी स्थापन केली करुन 70 आणि 80 च्या दशकातील सुपरस्टार्ससोबत अनेक हिट चित्रपट केले. ते 74 वर्षांचे होते. त्यांचा साथीदार मुशीर आलम यांचेही तीन वर्षांपूर्वी निधन झाले.
मुशीर रियाझ प्रॉडक्शन एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलेच नाव होते. त्या काळातील बडे स्टार्स आणि दिग्गज दिग्दर्शकांच्या भेटी त्यांच्या कार्यालयात जमायच्या.

मुशीर आलम आणि मोहम्मद रियाझ यांनी एकत्र केलेल्या चित्रपटांमध्ये राजेश खन्ना, दिलीप कुमार, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, सनी देओल, मिथुन चक्रवर्ती आणि अनिल कपूर यांसारख्या स्टार्सच्या चित्रपटांचा समावेश आहे. मुशीर आणि रियाझ या दोघांच्या कुटुंबीयांच्या जवळच्या लोकांनी मोहम्मद रियाझ यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मोहम्मद रियाझ यांनी नातेवाईक आणि भागीदार मुशीर आलम यांच्यासह ‘सफर’ , ‘मेहबूबा’,  ‘शक्ती’, ‘जबर्द’ मध्ये एकत्र काम केले. प्रकृती खालावल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे कुटुंबीय शेवटच्या वेळी त्यांच्यासोबत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा