मराठी टेलिव्हिजनवरील प्रचंड चेहरा आणि लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे होय. आपल्या सुंदर आणि सालस सौंदर्याने ती चाहत्यांचे मन जिंकून घेते. मराठी टेलिव्हिजनवरील एक लक्षवेधी चेहरा अशी ऋताची ओळख निर्माण झाली आहे. मालिका, नाटक आणि वेबसीरिजमध्ये काम करून तिचे नाव चाहत्यांच्या मनावर कोरले आहे. ऋताचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोविंग आहे. तिचे लाखांमध्ये चाहते आहेत.
ऋता (Hruta Durgule) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ऋताचे चाहते तिच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. गेल्या वर्षी ऋताने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. ऋताचे अचानक लग्न झाल्यामुळे लाखो चाहते तिच्यावर नाराज झाले होते. महाराष्ट्राची क्रश असलेली ऋताने (hruta durgule) बुधवारी (१८ मे २०२२) रोजी कोणालाही कल्पना न देता लग्न केले. तिने प्रतिक शाहसोबत लग्न केले. आता ऋताने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.
ऋताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, “एक नवी स्वप्नवत सुरुवात. प्रेम आणि स्वप्न. नवीन घर, खास दिवस.” ऋताने दिलेल हे कॅप्शन सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावर कमेंट करताना लिहिले की, “माझे हृदय अभिमानाने आणि आनंदाने भरले आहे. तुझ्या नवीन सुरुवातीसाठी.” दुसऱ्या एकाने कमेंट करताना लिहिले की, “मला वाटतं तू गरोदर आहेस.”
View this post on Instagram
ऋता दुर्गुळेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, ऋताने 2012 साली ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून भूमिका केली होती. तिची ही मालिका चांगलीच चर्चेत आली होती. तिने स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेत तिच्यासोबत सुयश टिळक आणि हर्षद अटकरी हे मुख्य भूमिका साकारताना दिसले. जवळपास तीन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. इथूनच ऋताचे नाव चर्चेत आले. यानंतर तिच्या करिअरला वळण मिळाले ते २०१७ साली ‘फुलपाखरू’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. (Marathi actress Hruta Durgule posted good news to her fans)
आधिक वाचा-
–‘ऍनिमल’ 24 तास कधीही पाहू शकता, रात्री 2 नंतर आणि पहाटे 5 पासून मुंबईमध्ये शो सुरु
–रणदीप हुडाने शेअर केले लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो, पारंपारिक पोशाखात नवविवाहित जोडप्याने वेधले लक्ष