मागील काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री म्हणजेच केतकी चितळे. बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्रींपैकी एक असणारी केतकी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्याही गोष्टीवर आपलं परखड मत मांडताना मागे- पुढे न पाहणाऱ्या केतकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केतकी चितळे इंस्टाग्राम स्टोरी शेअर केल्यामुळे चर्चेचे कारण ठरली आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे तिची स्टोरी…
केतकी चितळेची इंस्टाग्राम स्टोरी
अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये तिने म्हटले आहे की, “समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्यामागचा विचार का आला असेल? आम्हाला याच्याशी काही देणेघेणे नाही. सनातन धर्माला मारणे तेही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसेही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा, राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीर नव्हे, तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्याने आम्ही काहीही करायला मोकळे आहोत, अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो त्यांचा अपमान ही, असो) लावून असतातच.”
“एक मेसेज मिळताच किक मारून अशुद्ध मराठीत (महाराजांना शुद्ध भाषा अस्खलित येत असत, इकडे मातृ-पित्रृ भाषेची बोंब, असो) आरडाओरड सुरू. सनातनी हिंदू मारला जातोय. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा ख्रिस्ती आहेत व सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे,” असेही तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

आपल्या पोस्टचा शेवट करत केतकीने लिहिले की, “चार पैश्यात घोषणा करा, जातीयवाद निर्माण करा, सनातनी हिंदू झोपला आहे याचा फायदा घ्या, जे जागे आहेत त्यांना तुरुंगात टाका व केसेस ठोका. पण लक्षात असुद्या झोपलेला जेव्हा जागा होतो, तेव्हा तो पेटून उठतो.”
मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Marathi Actress Ketaki Chitale) हिने ही इंस्टाग्राम स्टोरी (Ketaki Chitale Instagram Story) काही वेळानंतर डिलीट केली. मात्र, यामुळे आता एकच खळबळ माजली आहे.
यापूर्वीही केले होते वादग्रस्त वक्तव्य
केतकीने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे तिला तुरुंगवासही सहन करावा लागला होता. मात्र, यानंतरही आता केतकी बेधडक वक्तव्य करताना दिसत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘किंग खान’ला झाले इन्फेक्शन, फक्त भात खाऊन काढतोय दिवस
चित्रपटाच्या पोस्टरवर झाला मोठा वाद, रिचा चढ्ढाची जीभ कापणाऱ्या बक्षीस जाहीर