Monday, September 25, 2023

अभिनेत्री मानसी नाईकने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा; म्हणाली, ‘चालकाला झोप लागली अन् आमची गाडी…’

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ‘आयटम गर्ल‘ अशी जिची ओळख आहे ती म्हणजे सर्वांची लाडकी मानसी नाईक होय. मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री आहे. मानसी तिच्या नृत्याच्या जोरावर सर्वांना नाचयला भाग पाडते. मानसी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होतात.

काही दिवसांपुर्वी मानसी ( Mansi Naik) तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. त्यामुळे ती चर्चेत राहीली. या दरम्यान मानसीला अनेक धक्के बसले होते. इतकचं नाही तर मानसीचा या अडचणीच्या काळात दोनदा अपघात झाला होता. त्याबद्दल मानसीने अनेक खुलासे केले आहेत. तिने ‘गप्पामस्ती पॉडकास्ट’मध्ये हे खुलासा केला आहे.मानसीचे परळीहून घरी जाताना आणि महामार्गावर रात्रीच्या वेळी कारमधून प्रवास करताना असताना दोन भीषन अपघात झाले होते.

त्या बद्दल सांगताना मानसी म्हणाली की,” मी रात्रीच्या वेळी महामार्गावरून प्रवास करत होते. त्यावेळी भीषण अपघात झाला. तेव्हा माझी टिम माझ्यासोबत होते. चालकाची झोर लागल्यामुळे अचानक गाडी ट्रकमध्ये घुसली… त्यावेळी चालकाला काही झाले नाही परंतु, त्याच्या बाजूला बसलेल्या माझ्या सुरक्षारक्षकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी माझा पुनर्जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही. तेव्हाच मी ठरवले की, आता रात्रीचा प्रवास अजिबात करणार नाही.”

ती पुढे बोलताना म्हणाली की, “अपघात झाल्यावर आम्हाला तेथील कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली. त्यावेळी ही गोष्टी अजिबात मीडियापर्यंत पोहोचली नाही. या आगोदरचा अपघात देखील असाच झाला होता. त्यामुळे मी यापुढे काही झाले तरी रात्रीचा प्रवास करणार नाही. या सगळ्यात गणपती बाप्पा, आई तुळजाभवानी आणि स्वामी समर्थ या देवावर असलेला विश्वास आणखी वाढला होता.आधीपेक्षा मी प्रचंड शांत आणि संयमी झाले आहे…आता मी स्वत:ला जास्त वेळ देते आणि यापुढे कायम देत राहीन ” असे तिने सांगितले. (Marathi actress Mansi Naik shared the thrilling experience of the accident)

अधिक वाचा- 
प्रिया बेर्डेंचा गौप्यस्फोट! राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर म्हणाल्या, ‘मी घुसमटणारी नाहीये पण…’
उर्फी जावेद बायसेक्शुअल आहे का? अभिनत्रीचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न

हे देखील वाचा