मराठी सिनेसृष्टीतील मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या लुक्सने नेहमी सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते आहेत. सुंदर चेहरा आणि आकर्षक फिगर असणाऱ्या पूजाची फॅन फॉलोविंगही तगडी आहे. दररोज आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
नुकतेच पूजा सावंतने एक फोटोशूट केलंय. यात तिने ऑफ-शोल्डर गाऊन घातला आहे. लाल रंगाच्या या गाऊनमध्ये ती पोज देताना दिसली आहे. तसेच, तिने हलका मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत. ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. तिने बोटांमध्ये जाड अंगठी घालून, हातात एक डिझाइन पर्स पकडली आहे.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे. फोटोतील तिचा लूक आणि ग्लॅमरस अंदाज पाहून तिचे चाहते खूपच प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे चाहत्यांनी तिच्या पोस्टवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला.
याव्यतिरिक्त तिने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात अभिनेत्री एका काळ्या रंगाच्या डिझाइन गाऊनमध्ये दिसत आहे. तिचा हा ड्रेसही ऑफ-शोल्डर आहे. यातील तिचा लुक अगदी मनमोहक आहे. या फोटोलाही चाहत्यांनी खूप प्रेम दिले. चाहत्यांनी कमेंटबॉक्स मध्ये हार्टचे इमोजी पोस्ट करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. अवघ्या काही तासांतच फोटोला 50 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने 2010 मध्ये आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 2015 साली आलेल्या ‘दगडी चाळ’ चित्रपटातील तिची भूमिका खूपच गाजली.
यांनातर 2018 साली ‘लपाछपी’ या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पूजा सावंतला ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला हिंदी चित्रपटांचीही ऑफर आली. 2019मध्ये आलेल्या जंगली या चित्रपटात ती विद्युत जामवालसोबत दिसली. यात तिने नायिकेची भूमिका साकारली होती. आता सध्या पूजा एका डान्स रियॅलिटी शोची परीक्षक बनली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा–
-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा