Saturday, December 7, 2024
Home अन्य हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी ‘नकटो’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला! काही तासांतच व्हिडिओला मिळाले लाखो व्ह्यूज

हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी ‘नकटो’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला! काही तासांतच व्हिडिओला मिळाले लाखो व्ह्यूज

हरियाणाची डान्सिंग क्वीन सपना चौधरीचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तिची अनेक गाणी सुप्रसिद्ध झाली आहेत. हरियाणाची डान्सिंग क्वीन आपल्या चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करायला कधीच चुकत नाही. मूळची रोहतक येथे राहणारी सपना यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या दिलखेच डान्सने ती रसिकांची मने जिंकत असते. शिवाय तिने नेहमीच आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर राडा केला आहे. तिचा लूक तर कमालीचा आहेच, पण आपल्या डान्स स्टेप्सने ती रसिकांना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडते.

हरियाणाच्या या प्रसिद्ध डान्सरचे नुकतेच कुलदीप राठीसोबतचे एक हरियाणवी गाणे रिलीझ झाले आहे. सपनाच्या या गाण्यावरील डान्सप्रमाणे तिचा लूक सुद्धा उठून दिसतोय. ३ मिनिटे आणि ३६ सेकंदाच्या या गाण्याने अक्षरशः यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे रिलीझ करताच काही वेळातच या गाण्याला लाखाो व्ह्यूज मिळाले.

आपल्या या गाण्यात ती गोविंदाच्या स्टेपवर थिरकताना दिसत आहे. त्यानंतर खूप लोकांनी तिची तुलना गोविंदा सोबत केली आहे. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली आहे. तिच्या या गाण्यामुळे अनेक चाहते तिच्या प्रेमात पुन्हा पडले आहेत.

या गाण्याचे नाव आहे ‘नकटो’. या गाण्याचे बोल आरबी गुर्जर यांनी लिहिले आहे, तर हे गीत सुरेंद्र रोमियो यांनी गायले आहे. सोबतच गाण्याला जीआर यांनी संगीत दिले आहे.

सपनाला पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीवरून तिच्या लोकप्रियतेचा अचूक अंदाज येतो. तिचा प्रत्येक गाण्यांमध्ये ते वेगळ्या अंदाजामध्ये दिसत असते. मध्यंतरी तिच्या ‘बटेऊ कंजूस’ व ‘मिल्की’ ही गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या खूप जास्त पसंतीस उतरली होती. हरियाणाची ही डान्सर अनेक बॉलिवूड चित्रपटात देखील थिरकली आहे.

आपल्या वयाच्या नवव्या वर्षापासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करते आहे. तिने गायलेले ‘है सॉलिड बॉडी’ हे गाणे तुफान गाजले होते. वयाच्या बाराव्या वर्षी तिच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिने स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. तशी तर ती हरियाना आणि पश्चिम यूपीमध्ये आधीच प्रसिद्ध झाली होती, पण बिग बॉस या मालिकेत आल्यानंतर ती देशभरात प्रसिद्ध झाली.

आपल्या धमाकेदार डान्सने वेड लावणारी सपना बॉलिवूडमध्ये देखील दिसली होती. ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ असे या चित्रपटाचे नाव होते. ज्यात तिच्यासोबत अभिनेता विक्रांत आनंद मुख्य भूमिकेत होता. सन२०२० मध्ये तिने हरियाणवी गायक, रायटर आणि मॉडेल वीर साहू सोबत कोर्ट मॅरेज केले होते. ही गोष्ट तिच्या चाहत्यांच्या फार उशिरा समजली होती. तिच्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

-पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाच्या लग्नात श्रद्धाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा