निसर्गाच्या सानिध्यात, समुद्राच्या लाटांशी खेळताना दिसली मराठमोळी प्रार्थना बेहरे; लेटेस्ट फोटो होतायेत व्हायरल


मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत काही ना काही पोस्ट करून ती चाहत्यांचे मनोरंजन करते. एवढेच नव्हे, तर तिचे सुंदर व आकर्षक फोटो पोस्ट करून ती अवघ्या चाहत्यावर्गाचे लक्ष आपल्याकडे वेधत असते. चाहतेही तिच्या पोस्टला भरभरून प्रेम देत असतात. अभिनेत्रीने नुकतेच शेअर केलेले फोटो देखील नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले असल्याचे दिसत आहे.

प्रार्थनाने तिचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती समुद्राच्या किनाऱ्यावर लाटांशी खेळताना दिसत आहे. यावेळी तिने निळ्या रंगाचा शॉर्ट वन पीस घालून कंबरेला पांढऱ्या रंगाचा शर्ट बांधला आहे. या लूकमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना जो आनंद तिच्या चेहऱ्यावर आला आहे, तो तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

प्रार्थनाने शेअर केलेले हे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच, कमेंट करत नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे फोटो शेअर करत प्रार्थना म्हणतेय की, “मला असे वाटते की पाऊस, समुद्र आणि वारा यांच्या एकत्रितपणे ऐकायला येणाऱ्या आवाजापेक्षा रोमँटिक आवाजच नाहीये.”

प्रार्थना बेहेरेने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत वैशालीची सहाय्यक भूमिका साकारत ती घराघरात पोहचली. पुढे ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

प्रार्थनाने ‘९ एक्स झकास हिरोईन हंट- सीझन १’ चे विजेतेपदही पटकावले होते. यामुळे तिला, स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी अभिनित ‘मितवा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त तिने ‘बॉडीगार्ड,’ ‘वजह तुम हो’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. प्रार्थना आता लवकरच ‘छूमंतर’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.