Priya Marathe Death | ऐन गणेशोत्सवाच्या सणामध्ये मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. ती म्हणजे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचे दुःखद निधन झालेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार कर्करोगाशी झुंज देत प्रिया मराठे हिचे निधन झालेले आहे. कर्करोगाशी तिची लढाई अपयशी ठरून वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतलेला आहे.
प्रिया मराठे (Priya Marathe Death ) मोघे हिने पहाटे 4 वाजता मिरा रोड या ठिकाणी अखेरचा श्वास घेतलेला आहे. शंतनू मोघे यांची पत्नी प्रिया मराठे हिने मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीतही अनेक ठिकाणी काम केलेले आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षापासून ती कर्करोगाशी झुंज देत आहे. गेल्या वर्षापासून ती सोशल मीडियावर देखील क्रिया नव्हती. 11 ऑगस्ट 2024 रोजी तिने शेवटची पोस्ट सोशल मीडियावर केलेली आहे. परंतु अचानक तिच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरलेली आहे.
प्रिया मराठे हिने या सुखांनो या, चार दिवस सासूचे, तू तिथे मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, येऊ कशी कशी मी नांदायला यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेले आहे. यासोबत तिने हिंदी मालिकेतही काम केलेले आहे. यामध्ये तिने पवित्र रिश्ता, उतरण, कसम से, बडे अच्छे लगते है यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘पति पत्नी और वो 2’च्या शूटिंगदरम्यान गोंधळ, प्रयागराजमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण










