‘फँड्री’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. का नाही आठवणार शेवटी तुम्हाला देखील तिच्या प्रितीचा विंचू चावलाच असेल ना? आता आलं ना ध्यानात! आपण बोलत आहोत सर्वांच्या लाडक्या शालूबद्दल. अत्यंत साधीभोळी, दोन वेण्या घालून शाळेत जाणारी शालू म्हणजेच राजेश्वरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आणि हॉट आहे. तिच्या चित्रपटापेक्षा सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरूनच खूपच चर्चेत असते. अशातच तिचा एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे.
राजेश्वरीने अलीकडेच सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने काळ्या आणि चंदेरी रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या लूकमधील सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिचा आय मेकअप. तिने खूप सुंदर आय मेकअप केला आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहेत आणि कानात ईअरिंग घातले आहेत. (Marathi actress rajeshwari kharat share her glamorous photos on social media)
तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “सौंदर्याची खाण,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “बॉलिवूडमध्ये एन्ट्री करायला काही हरकत नाही आता,” अशी कमेंट केली आहे. यासोबत एकाने “बेबी डॉल,” अशी कमेंट केली आहे.
राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. नुकतेच तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. नुकतेच तिने तिच्या आगामी ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात ती वेश्येच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचे चाहते तिचा हा चित्रपटात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान
-सोनम कपूरच्या आयुष्यात ‘Someone special’ची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘तयार व्हा’