मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीमध्ये अनेक सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री आहेत, पण सध्या सोशल मीडियावर बोल्डनेसच्या बाबतीत एका अभिनेत्रीचे पारडे चांगलेच जड ठरत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या सर्वांची राधा म्हणजेच श्रृती मराठे. श्रृतीने झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिच्या साध्या पोषाखाने तसेच मनमोकळ्या स्वभावाने तिने समस्त महाराष्ट्राला भुरळ घातली होती. आताही ती यात काही कमतरता पडू देत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी जोडून आहे.
श्रृतीने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहे. ज्यात ती प्रचंड हॉट दिसत आहे. श्रृतीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाचा कॅज्युअल शर्ट तसेच पिवळ्या रंगाचे ट्राउझर आणि ब्लेझर परिधान केले आहे. ती या फोटोमध्ये खुर्चीसोबत बोल्ड पोझ देताना दिसत आहे. तिचा हा लूक खूपच वेगळा दिसत आहे. तसेच तिचा मेकअप देखील खूप आकर्षक आहे. (Marathi actress Shruti Marathe’s bold photo viral on social media)
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.
श्रृती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?