Friday, November 15, 2024
Home मराठी अप्सरेचा हा डान्स तुम्हालाही करेल थक्क, पहा सोनालीचा अनोखा अंदाज

अप्सरेचा हा डान्स तुम्हालाही करेल थक्क, पहा सोनालीचा अनोखा अंदाज

सोनाली कुलकर्णीचे नाव घेताच ‘अप्सरा आली…’वर तिने केलेल्या बेभान नृत्य आणि अदाकारीची दृश्यं मराठी रसिकांच्या डोळ्यांसमोर तरळू लागतात. आता अजून एका नव्या गाण्यावर तिने दिलेला भन्नाट परफॉर्मन्स असंख्य चाहत्यांना वेड लावतो आहे.सोनालीच्या अभिनयासह आरस्पानी सौंदर्याचे चाहते देशभरात आहेत. हे सगळे कायमच तिच्या नवनव्या चित्रपटांची वाट पाहत असतात. समाजमाध्यमांवरही चांगलीच सक्रिय असलेली सोनाली वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्ससह आगामी चित्रपटांबाबतही वेळोवेळी माहिती देत असते. आताही सोनालीच्या अशाच एका पोस्टची चर्चा आहे. ‘तमाशा लाइव्ह’ या तिच्या बहुचर्चित चित्रपटातले एक नवेकोरे गाणे प्रदर्शित झाले आहे.

‘मला तुझा रंग लागला’ असे या गाण्याचे बोल आहेत. सोनाली अतिशय आकर्षक पेहरावात आपल्या अनोख्या पदन्यासाची जादू या गाण्यात दाखवते आहे. अल्पावधीतच या गाण्याला तब्ब्ल 1 मिलियनहून जास्त व्ह्युज मिळाले आहेत. ‘तमाशा लाइव्ह’ची खास गोष्ट म्हणजे यात स्वत: सोनालीनेही ‘कडकलक्ष्मी’ हे गाणे गायले आहे.’तमाशा लाइव्ह’ हा सिनेमा 15 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरलाही रसिकांचा मोठाच प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरला 3 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. या सिनेमात सोनालीसह पुष्कर जोग, सिद्धार्थ जाधव, मृणाल देशपांडे, सचित पाटील, नागेश भोसले, भरत जाधव, हेमांगी कवी, मनमीत पेम यांच्या भूमिका आहेत.

 

पुष्कर जोग यानेही स्वदेशी सोशल मीडिया अप ‘कू’वर एक खास पोस्ट टाकली आहे. पुष्करच्या एका चाहतीने खास स्वत: तमाशा लाइव्हचा ट्रेलर तयार केला आहे. निकिता असे तिचे नाव असून आपल्या पोस्टमध्ये पुष्करने तिचे आभारही मानले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा