मराठी सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे (Suhasini Deshpande) यांचे काळ म्हणजेच मंगळवारी निधन झाले आहे. त्यांनी पुण्यातील रहात्या घरी शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकार तसेच त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांनी मराठीसोबत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. याआधी त्या शेवटच्या रोहित शेट्टीच्या सिंघम या चित्रपटात दिसल्या होत्या.
सुहासिनी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव होते, त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. यामध्ये मनाचं कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), मी शपथ (2006) आणि चिरंजीव (2016) या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोनीश पवार दिग्दर्शित ‘धोंडी’ या चित्रपटातही त्या दिसल्या होत्या. त्या एन. रेळेकर दिग्दर्शित 2017 चा मराठी चित्रपट ‘छंदा प्रीतीचा’ आणि 2019 चा ‘बाकाल’ या चित्रपटाशीही जोडल्या गेल्या होत्या
सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर आज बुधवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘सिंघम’ हा सुहासिनीचा शेवटचा हिंदी चित्रपट होता, ज्यामध्ये त्यांनी काजल अग्रवालच्या काव्याच्या आजीची भूमिका केली होती.
सुहासिनी देशपांडे यांनी वयाच्या 12 व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि गेल्या 70 वर्षांत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आपल्या दमदार अभिनय कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांवर छाप सोडली. अभिनेत्रीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
विजय सेतुपतीने का नाकारला आरसी 16 चित्रपट; मोठे कारण आले समोर
कंगनाने केली ॲनिमलवर टीका; फक्त ड्रग्ज करूनच सगळे मजा घेत आहेत…