Thursday, April 18, 2024

‘मी माजोरी नाही…’, तेजस्विनी पंडितचे निर्मिती क्षेत्राबद्दल मोठे वक्तव्य

मराठी चित्रपट इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित सतत आपल्या कामामुळे ओळखली जाते. तिने चित्रपटांशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धुमाकुळ घातला आहे. वेबसिरिज, मालिका यामध्येही तिने आपल्या दमदार अभिनयाची धमक दाखवली आहे. तिने साकारलेल्या भूमिकांचे कलाकार भरभरुन कौतुकही करत असतात. तेजस्विनीने नुकतंच निर्मिती क्षेत्रीमध्ये पदार्पण केले आहे. ‘प्लॅनेट मराठी‘ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘अथांग’ मराठी वेबसीरिजच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने नुकतंच सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणजे’ या ऑडिओ पॉडकास्टसाठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान निर्मिती क्षेत्रामध्ये आल्यानंतर तिला आलेला अनुभव सांगितला आहे. त्याशिवाय मराठी इंडस्ट्रीमध्ये तिच्याबद्दल जे काही गैरसमज पसरलेले आहेl त्यावरही तिने तिचे मत व्यक्त केलं आहे.

अनेकदा असे होते की, चित्रपटामध्ये किंवा मालिकांमध्ये काम केल्यानंतर निर्माता वेळेवर पैसे देत नाहीत आणि बऱ्याचदा या दोघांमध्ये वादही होत असतात. यावर तेजस्विनीने तिचे स्पष्टच मत मांडले आहे. तिने सांगितले की, “माझ्यात प्रचंड माज आहे. असं अनेकदा लोकांना वाटत असलं तरी माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी माहित आहे की, मी कशी आहे आणि ते असं कधीच म्हणनार नाही. त्यांना माहित आहे मी माजोरी नाही. त्याशिवाय माझ्या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मी वेळच्या वेळी पैसे दिले आहेत.”

 

View this post on Instagram

 

केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या ‘आगं बाई अरेच्चा!’ (Aga Bai Arrecha!) या चित्रपटामधून तेजस्वि पंडितने मराठी इंडसट्रीमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) या साकारलेल्या भुमिकेचेही खूप कौतुक झाले होते. नुकतंच अभिनेत्रीने ‘अथांग’ वेबसिरिजची निर्मिती केली आहे. संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साउथ विरुद्ध बॉलिवूडविषयी रोहित शेट्टीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमचेच नाही, त्यांचेही…’
अजय अन् सैफचे 1999 मधील न पाहिलेले फोटो, अभिनेत्याने पोस्ट करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा