जाळ अन् धूर संगटच! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पारंपारिक लुकने चाहत्यांना भुरळ, एकदा नजर टाकाच

marathi cinema actress trupti toradmal traditional photos gone viral on social media see photos here bhojpuri south ashas


काही वर्षांतच मराठी चित्रपटसृष्टीत आपली चांगली ओळख निर्माण करणारी सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तृप्ती तोरडमल. ती अभिनयाबरोबरच तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. इंस्टाग्रामवर तृप्तीचे बरेच बोल्ड आणि वेस्टर्न लूकमध्ये असलेले फोटो आपल्याला पाहायला मिळतील. परंतु अलीकडेच तृप्तीने तिचे काही पारंपारिक लुकमधील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. जे तिच्या चाहत्यांची मने जिंकत आहेत.

तृप्तीच्या चाहत्यांना तिचे हे पारंपरिक फोटो खूप आवडल्याचे दिसून येत आहे. चाहते फोटोंवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुकही करत आहेत.

याव्यतिरिक्त तृप्ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि इंस्टाग्रामवर तिचे 43 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. ज्यांना अभिनेत्रीचे वेगवेगळे अवतार बघायला मिळतात. गेल्या महिन्यात तृप्तीने लाल लेहंग्यामध्ये फोटोशूट केले होते. ज्याचे फोटोही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये तृप्तीचा निराळा लूक दिसत आहे.

एक तरुण अभिनेत्री म्हणून तिला इंडस्ट्रीत बरीच ओळख मिळाली आहे. तृप्तीने 2018 साली ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. तृप्ती मराठी अभिनेत्रींसाठी बनवलेल्या जुन्या समजांनाही तिच्या कामुक अवतारातून तोडते. ज्याअंतर्गत लोकांना असे वाटायचे की, मराठी अभिनेत्री बोल्ड स्टाईलमध्ये दिसू शकत नाहीत.

तिने 9 मार्च रोजी तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये तिने एक ऑफ-शोल्डर टॉप घातला होता. या फोटोत अभिनेत्री बोल्ड अंदाजात दिसली. तृप्तीच्या आणखी एका फोटोशूटची जानेवारीत प्रशंसा झाली होती. ज्यात तिने अतिशय हॉट स्टाईलमध्ये साडी नेसली होती आणि त्यावर निळ्या रंगाचा डेनिम जॅकेट घातला होता.

या फोटोसोबत तृप्तीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “नियम विसरा, तुम्हाला जे आवडेल ते घाला.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘भाईजान’ची अभिनेत्री चक्क बाथटबमध्ये बसून देतेय पोझ! बोल्ड अंदाज पाहून चाहतेही दंग, फोटो व्हायरल

-व्हिडिओ: सपना चौधरीला टक्कर द्यायला आली नवी हरियाणवी डान्सर; गजब डान्सने लावले चाहत्यांना वेड

-कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.