‘भाईजान’ची अभिनेत्री चक्क बाथटबमध्ये बसून देतेय पोझ! बोल्ड अंदाज पाहून चाहतेही दंग, फोटो व्हायरल

bollywood zareen khan got a bold photoshoot done in bathtub photos went viral an


अभिनेत्री झरीन खानने सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली. पण झरीन खान तिच्या अपेक्षेनुसार चित्रपटांमध्ये इतकी यशस्वी झाली नाही. मात्र, ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती तिच्या मनमोहक लूकने नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधत असते. चाहतेही तिच्या फोटोंवर सतत प्रतिक्रिया देत असतात. अलीकडेच अभिनेत्रीने बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.

या फोटोमध्ये झरीन बाथटबमध्ये बसलेली दिसत असून ती खूप हॉट पोझ देत आहे. यात चाहत्यांना झरीनची किलर स्टाईल पाहायला मिळाली. तिने इंस्टाग्रामवर तिचे अत्यंत हॉट फोटो शेअर केले आहेत. जे चाहत्यांना वेड लावायला पुरेसे आहेत.

फोटो शेअर करत झरीनने लिहिले, “ते, तुमची सुपर पॉवर काय आहे? मी: मी एक स्त्री आहे! सर्व सुंदर महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

तिचा हा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. चाहते या फोटोवर जोरदार कमेंट्स करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत.

अभिनेत्री होण्यापूर्वी झरीन खानला डॉक्टर व्हायचे होते. तिने कधीही अभिनयाच्या जगात येण्याचा विचार केला नव्हता. सलमान खानने झरीनला चित्रपटसृष्टीत आणले. त्यानेच त्याच्या ‘वीर’ या चित्रपटासाठी झरीनकडे मागणी घातली होती. झरीनने तिच्या या पहिल्या चित्रपटात राजकुमारीची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटाने काही खास कामगिरी केली नाही.

काही दिवसांनंतर झरीन सलमानच्या ‘रेड्डी’ चित्रपटाच्या आयटम सॉंग ‘कॅरेक्टर ढीला है’ मध्ये दिसली होती. यानंतर ती बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या ‘हाऊसफुल 2’ या चित्रपटातही दिसली. पुढे ती ‘हेट स्टोरी 3’ चाही एक भाग राहिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सैफच्या दुसऱ्या लग्नाला लावली होती साराने हजेरी, पहिल्या बायकोने स्वत: केले होते तयार

-अभिमानास्पद! महानायक अमिताभ बच्चन यांना मिळणार आंतरराष्ट्रीय पुरस्कार; प्रसिद्ध दिग्दर्शक करणार सन्मानित

-वाह उस्ताद वाह! ‘तबल्याचे जादूगार’ झाकीर हुसेन यांनी शबाना आझमीसोबत केलंय चित्रपटात काम, तर ‘ग्रॅमी’ दोनदा खिशात


Leave A Reply

Your email address will not be published.