Friday, July 5, 2024

‘सुशांत राजपूत एक प्रतिभावंतर कलाकार…’,म्हणत, शरद केळकरने व्यक्त केल्या भावना

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर याने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही क्षेत्रातून केली होती. त्याची पहिली दुरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका ‘आक्रोश’ मध्ये त्याने पोलिस अधिकारी ‘सचीन कुलकर्णी’ ही भूमिका निभावली होती. यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम करुन घराघरामध्ये ओळख मिळवली. शरदने आपल्या दमदार अभिनयाने मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले. नुकतंच त्याने एका मुलाखतीदरम्यान दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या बद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) त्याने खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याच्यासारखंच करिअर सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याचे होते. त्याने देखिल आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही क्षेत्राातूनच केली होती. त्याला पवित्र रिश्ता’ या मालिकेतील मानव नावाच्या भूमिकेने घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.

काही दिवसांपूर्वी अभिनेता शदर केळकर याने एका मुलाखतीदरम्यान सुशांतचे कौतुक करत सांगितले की, “तो एक प्रतिभावंत कलाकार होता, ज्याने टीव्ही क्षेत्रामधून लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.छोट्या पडद्यावरील काम केल्यानंतर आपल्या हिंमतीवर त्याने बॉलिवूडसारख्या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये यशाचे शिखर गाठून तो प्रेरनादायी व्यक्तीमत्व बनला होता.”

शरदने पुढे सांगितले, “बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये केवळ दोनच असे अभिनेता आहेत, ज्यांनी अशाप्रकारे आपले करिअर बनवले. एकतर शाहरुख खान (Shaharukh Khan ज्याने छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर चित्रपटात काम केले. सुशांत देखिल आपल्या अभिनयाच्या जोरवर बॉलिवूड वइंडस्ट्रीमध्ये पुढे आला. मी सुशातला खूप आधीपासून ओळखत होतो. मी जेव्हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो, तेव्हा त्याचा सेट आणि माझा सेट जवळजवळ असायचा. आम्ही नेहमी एकत्र बसून गप्पा मारायचो, तो दमदार अभिनेत्यासोबत एक चांगला माणुसही होता.”

शरद केळकर याने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘हर हर महादेव‘ (Har Har Mahadev) मध्येही शरद झळकला. यापूर्वीही त्याने ‘कोड नेम तिरंगा’, ‘ऑपरेशन रोमियो’ आणि ‘भुज’ चित्रपटामध्ये झळकला होता. 2020 साली अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबत ‘लक्ष्मी’ चित्रपटामध्ये तृतीयपंथी भूमिकेसाठी शरदचे खूप कौतकही केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथाला भेटल्यावर नागा चैतन्या करणार ‘हे’ काम, अभिनेत्याने केला खुलासा
समंथाच्या अगोदर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्यात होता नागा चैतन्य, तर ‘असा’ होता त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास

हे देखील वाचा