नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या धूम धडाक्यात साजरी करण्यात आली. महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व हे आज पिढीला आणि येणाऱ्या असंख्य पिढयांना चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचे विशेष काम अनेक दिग्गज लोकं करत आहेत. महाराजांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे हिंदवी स्वराज्यासाठी वेचले. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित कधीच नव्हते. त्यांनी संपूर्ण देशभर प्रवास करत सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना जागरूक केली. महाराजांचे कार्य इतके मोठे आणि गहिरे आहे, त्याबद्दल बोलणे सांगणे कधीच पुरणार नाही. आता तर महाराष्ट्राला अभिमान आणि गर्व वाटावा अशी घटना घडली आहे. महाराजांच्या कार्याची दखल अनेकदा भारताबाहेरून देखील घेतली गेली. आता पुन्हा एकदा महाराजांच्या कार्याला सलाम करणारी एक बाब घडली आहे.
इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या सरकारपुढे ठेवला आहे. याच संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इस्राईलचे conculate यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची भेट घेत त्यांच्याशी महाराजांबद्दल चर्चा केली.
View this post on Instagram
याबद्दल माहिती देणारी एक पोस्ट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले,”ईस्राईल… छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे. विविध क्षेत्रांतील कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या लोकांशी चर्चा करून इस्राईल चे Consulate हे शिवरायांच्या बाबतीत माहिती गोळा करत आहेत. Consulate ऑफिस मधून आलेल्या निमंत्रणानुसार Consul general Mr. Kobbi Shoshani यांची भेट झाली.”
पुढे दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले, “त्यावेळी त्यांच्याशी शिवरायांच्या रोमहर्षक प्रशासकीय गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलेले मुद्दे ऐकल्यानंतर श्री. kobbi यांनी शिवरायांची प्रशंसा केली. त्यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा अनुवादित ग्रंथाची इंग्रजी प्रत आणि महाराजांच्या जिरेटोपाचे स्मृतिचिन्ह श्री. दिग्पाल लांजेकर यांनी भेट दिले.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्रिखंडात असेच गाजत राहो आणि या शिवयज्ञात सातत्याने आमच्याकडून समिधा अर्पण होत राहोत ही शिवचरणी प्रार्थना…” ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.” यासोबतच त्यांनी या भेटीचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
तत्पूर्वी दिग्पाल लांजेकर हे मराठीमधील अतिशय प्रतिभावान दिग्दर्शक असून, ते त्यांच्या ऐतिहासिक चित्रपटांबद्दल ओळखले जातात. त्यांच्या ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांना तर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून आता लवकरच ते त्यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची सुरुवात करणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पैसे कमावण्यासाठी विकायचे चहा, पहिल्या पत्नीसोबत केले होते दुसऱ्यांदा लग्न; वाचा ‘अन्नू कपूर’ यांचा संघर्षमय प्रवास
हंसिका मोटवानी ओटीटीवर तिचे लग्न दाखवण्यासाठी सज्ज, वेब सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज