Monday, September 25, 2023

‘केस झाले आता दाढी वाढवा’, म्हणत चाहत्यांनी सिद्धार्थ जाधवला दिला ‘हा’ सल्ला

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. सिद्धार्थला चाहते सिद्धू या नावाने ओळखतात. सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रिय असतो.

सिद्धार्थचा (Siddharth Jadhav) खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याची विनोदी भूमिका चाहत्यांना खळखळून हसायल भाग पाडते. सिद्धार्थने खूप मेहनत करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रेक्षक सिद्धार्थचे नेहमीच कौतुक करतात. सिद्धार्थ सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतो. तो सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करत असतो. त्याच्या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत असतात.

सिद्धार्थने मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याने या क्षेत्रात यश मिळवले आहे. सिद्धार्थने केलेला संघर्ष सगळ्यांसाठीच एक प्रेरणा आहे. सिद्धार्थची सोशल मीडियावरही प्रचंड क्रेझ नेहमीच दिसून येते. तो देखील त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकतेच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन घेतलं. त्यावेळी त्याने चाहत्यांशी संवाद साधला.

या दरम्यान सिद्धार्थ एका नव्या लूकमध्ये दिसला. त्याचा लूक पाहुन चाहते थक्क झाले. त्यावेळी सिद्धार्थची वेगळी हेअरकट दिसला. त्यामुळे चाहत्यांनी सिद्धार्थवर प्रश्नांची सरबत केली. प्रश्नांची उत्तरे देताना सिद्धार्थने खूप मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला की,”हो मी हेअर कट केला आहे. कापले बाबा एकदाचे केस, असे म्हणत उत्तर दिले. त्यावर अनेकांनी सिद्धार्थला प्रश्न विचारले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

यावेळी एका चाहत्याने त्याला “केस झाले आता तुम्ही दाढी वाढवा”, असा सल्ला दिला. यावर सिद्धार्थ म्हणाला की, “अरे नाही ना भावा. दाढी काही केल तरी वाढतच नाही. एकदा महिनाभर वाढवली होती, खूप कमी वाढली होती.” त्याचे हे उत्तर ऐकून चाहते देखील हसू लागले. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थच्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे. (marathi famous actor siddharth jadhav instagram live session talk about his beard and hair cut)

अधिक वाचा- 
अक्षय कुमारने ऐकला होता आईचा ‘तो’ लाख मोलाचा सल्ला, मुलाखतीमध्ये केला खुलासा
अभिनेता होऊन झाडांमागे रोमान्स करणाऱ्यांमधले नव्हते प्राण, खलनायक साकारून नायकालाही दिली त्यांनी टक्कर

हे देखील वाचा