Friday, March 31, 2023

जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत ९ दिवसांनी अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे दोन्ही गायक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांच्यातील मैत्री सगळ्यांना माहित आहे. परंतु काही दिवसांनी त्यांच्या या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रोहित आणि जुईली मागील अनेक दिवसापासून रिलेशनमध्ये आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात. त्यांच्यातील प्रेम नेहमीच ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच रोहितने असा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, ते लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

रोहितने (rohit raut) सोशल मीडियावर जुईलीसोबत (juilee jogalekar) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ते दोघेही फोटोमध्ये खूप खुश दिसत आहेत. हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “मी नेहमीच तुला खुश दिसणार आहे.” तसेच त्याने ९ दिवस अजून असे लिहिले आहे. तसेच त्याने रोहिली असे लिहिले आहे. त्यामुळे आता सगळे असा अंदाज लावत आहेत की, आता ते ९ दिवसात ते लग्न किंवा साखरपुडा करणार आहेत.

रोहित आणि जुईली यांचे सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे फोटो शेअर करत असतात. रोहित आणि जुईली गेल्या १० वर्षांपासून सोबत आहेत. अप्रत्यक्षपणे त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली देखील सोशल मीडियावर दिली आहे. त्यांचे प्रेम हे दिवसेंदिवस फुलताना दिसत आहे. एकमेकांसोबत ते अगदी खुश दिसतात. (Marathi singer Rohit Raut and juilee jogalekar getting married soon)

रोहित हा ‘इंडियन आयडल’मध्ये दिसला होता. जुईली जोगळेकर ही ‘सुर नाव ध्यास नवा’ या शोमधून पुढे आली आहे. रोहितने अनेक गाणी गायली आहेत. यामध्ये ‘यारा यारा’, ‘शटरचा टाळा’, ‘मन मोहिनी’, ‘तू आहेस ना’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘गोलू मोलू’ यासारख्या गाणी गायली आहेत.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा