शेरशाह ते उरीपर्यंत, बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट भारतीय दाखवतात जवानांचे धैर्य; पाहा यादी


भारतीय लष्करावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत, ज्यात सैनिकांचे बलिदान आणि शौर्य दाखवण्यात आले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच खूप पसंती दिली आहे आणि भरभरून प्रेमही दिले आहे. चित्रपटांमध्ये सैनिकांचे शौर्य पाहून आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. या चित्रपटांपासून प्रेरित होऊन अनेक जण भारतीय लष्करात भरती होण्याचा निर्णयही घेतात. शनिवारी (१५ जानेवारी) भारतीय लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्करावर बनवलेल्या देशभक्तीपर चित्रपटांबद्दल जाणून घेऊया…

शेरशाह (Shershah)
नुकतेच परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर ‘शेरशाह’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांचे धैर्य दाखवण्यात आले आहे. अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते, त्यात विक्रम बत्रा हे देखील होते. ‘शेरशाह’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप पसंत केला गेला आहे.

उरी: द सर्जिकल स्ट्राइक (URI: The Surgical Strike)
पाकिस्तानने २०१६ मध्ये केलेल्या उरी हल्ल्यानंतर, भारतीय जवानांकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती. या सर्जिकल स्ट्राईकवर २०१९ साली चित्रपट बनवण्यात आला. ज्यामध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला खूप पसंती मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि त्याचे डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत.

लक्ष्य (Lakshya)
अभिनेता ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) ‘लक्ष्य’ हा चित्रपट आजही प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागवतो. या चित्रपटात प्रिती झिंटा (Preity Zinta) ऋतिकसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या युद्धपटाची कथा लेफ्टनंट करण शेरगिलवर आधारित आहे.

बॉर्डर (Border)
जेपी दत्ता यांचा ‘बॉर्डर’ चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर बनलेला आहे. एका आर्मी ऑफिसर आणि सैनिकांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट आजही पहिल्या दिवसाप्रमाणेच लोकप्रिय आहे. बॉर्डरमध्ये सनी देओल (Sunny Deol), सुनील शेट्टी (Suniel Shetty), अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले होते.

एलओसी-कारगिल (LOC- Kargil)

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्धावर ‘एलओसी कारगिल’ चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही जेपी दत्ता यांनी केले होते. या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Dutt), अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) मुख्य भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!