Friday, May 24, 2024

समीर चौघुलेंसाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “तुझ्यामुळेच मी…”

मनोरंजन विश्वातील सुंदर अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी होय. ती एक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच एक उत्तम कवियत्री, उत्तम डान्सर, फिटनेस प्रेमी देखील आहे. खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असलेली प्राजक्ता सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजताना दिसते. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो पोस्ट करत लोकांचे लक्ष वेधून घेत असते.

प्राजक्ता  (Prajatakta Mali) पारंपरिक, वेस्टर, इंडो वेस्टर्न आदी सर्वच लूकमध्ये देखील कमालीची सुंदर दिसते. तिची स्टाइल देखील चाहत्यांना खूपच आवडते. सध्या अभिनेत्री प्राजक्ता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांच्यासाठी केली आहे. ते 29 जूनला त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ताने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “दुग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा 50वा वाढदिवस आला आहे. खरचं सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस. तूझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली आहे. मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले आणि ही ओळख आयूष्यभर राहील, असं वाटतं.” अशी आशा तिने पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

तसेच, “समीर तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस. तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश, प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो.., आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो. ह्याच तूला 50व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!” असे लिहित त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अभिनेत्री प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेता प्रसाद ओक, समीर चौघुले यांच्याबरोबर उभी असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (Marathmoli actress Prajatakta Mali shared a post on social media wishing actor Sameer Chowghule on his birthday)

अधिक वाचा-  
‘कौन बनेगा करोडपती 15’चा नवा प्रोमो रिलीज, शोमध्ये येणार नवीन ट्विस्ट? अमिताभ बच्चन यांनी दिला ‘हा’ इशारा
सुशांत सिंग अन् दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचे सत्य येईल समाेर? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठा अपडेट

हे देखील वाचा