Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

Bye Bye 2021: ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी २०२१ मध्ये थाटला संसार, यादीवर टाका नजर

आता २०२१ हे वर्ष आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहे. मात्र, असे असले तरीही सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसाठी हे वर्ष खास ठरले आहे. या वर्षात अनेक कलाकारांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली, तर काहींनी थेट लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे चाहतेही भलतेच आनंदात आहेत. कलाकारांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. या वर्षात लग्न झालेल्या अशाच काही जोड्यांबद्दल आपणही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

वरुण धवन आणि नताशा दलाल
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल (Natasha Dalal) या दोघांनी २४ जानेवारीला लग्न केले. अलिबागच्या ‘द मॅन्शन हाऊस’ या रिसॉर्ट मध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. वरुण- नताशा यांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नयेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला होता. लग्नात कोणालाही आतमध्ये फोन नेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

दिया मिर्झा आणि वैभव रेखी
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) तिचा बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत (Vaibhav Rekhi) १५ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. वैभव हा एक यशस्वी व्यावसायिक आहे. दिया आणि वैभव दोघेही घटस्फोटीत असून त्यांचे हे दुसरे लग्न आहे. कुटुंबातील खास सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. दिया-वैभवचे लग्न एका महिला पंडिताने केले होते. दिया लग्नाअगोदरच गरोदर होती. तिने लग्नानंतर चार महिन्यांनी म्हणजे १४ मे रोजी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अव्यान आझाद आहे.

यामी गौतम आणि आदित्य धर
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) ४ जून रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरसोबत (Aditya Dhar) लग्न केले. यामी गौतमचा पती आदित्य धर बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि गीतकार आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आदित्य धरनेच केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. दिग्दर्शक म्हणून आदित्यचा हा पहिलाच चित्रपट होता.

राजकुमार राव आणि पत्रलेखा
अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) यांनीदेखील या वर्षात लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधील या जोडप्याचा चंदीगडमध्ये १५ नोव्हेंबरला लग्नसोहळा पार पडला. “११ वर्षांचं प्रेम, मैत्री आणि उत्तम सहवासानंतर मी माझी सर्व काही, माझी बेस्टफ्रेंड, माझं कुटुंब असणाऱ्या पत्रलेखाशी विवाह केला. पत्रलेखा आज मला तुझा पती म्हणवतानाचा क्षण इतर कुठल्याही क्षणापेक्षा जास्त आनंदाचा वाटत आहे”, अशी पोस्ट राजकुमारने लग्नानंतर केली.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ
विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच लग्नबंधनात अडकले. ९ डिसेंबरला राजस्थानच्या बरवाडा येथील सिक्स सेंन्स फोर्टमध्ये त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर ते दोघेही मालदीवला हनीमूनसाठी रवाना झाले.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांनी १४ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केले.

मराठमोळ्या लूकमध्ये अंकिताने तिचे फोटो शेअर केले होते. तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा