Saturday, June 29, 2024

नीना गुप्तांच्या मुलीने थेट वडिलांसमोरच केलं पतीला किस, व्हायरल व्हिडिओवर नेटेकऱ्यांनी व्याक्त केला संताप

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांनी इंडस्ट्रीमधील अनेक गाजाणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड क्षेत्रामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नुकतंच त्यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने तिचा बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा याच्यासोबत विवाह बंधनात अडकली आहे. या लाग्नाला नीना गुप्ता आणि तिचे वडील विवियन रिचर्ड्स यांनी देखिल हजेरी लावली होती. मसाबाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या लग्नाची कबुली दिली होती. लग्नानंतर मसाबाने रिसेप्शन पार्टी दिली होती. ज्यातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

नुकतंच अभिनेत्री आणि फॅशेन डिझायनर मसाबा गुप्ता (Masaba Gupta) हिने तिच बॉयफ्रेंड सत्यदिप मिश्रा (Satyadeep Mishra) सोबत विवाह बंधनात अडकली आहे. लग्नानंतर या जोडप्याने बॉलिवूड सेलिब्रिटिंसाठी एक रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती त्याशिवाय या पर्टीचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. अशातच या पार्टीमध्ये मसाबाने असे काही कृत्य केलं आहे ज्यामुळे अनेकांचे लक्षल वेधलंअसून तिला ट्रोलिंगचा सामना कारावा लागत आहे.

मसाबाच्या पार्टीमध्ये सोनम कपूर, दिया मिर्झा, कोंकणा सेन शर्मा यांच्यासह मसाबाचे वडील विवियन रिचर्ड्स आणि आई नीना गुप्ताही दिसले. याशिवाय या पार्टीला आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनीही हजेरी लावली होती. पण या पार्टीत मसाबा आणि सत्यदिप यांच्या लिपलॉकची सर्वाधिक चर्चा झाली. केककटींगच्या वेळी मसाबाने पती सत्यादीपला किस केलं मात्र ती एवढ्यावरच थांबली नाही तर दोघांनी सुरुवातीला एकमेंकींना केक भरवला आणि किस केलं मग कोणीतरी बोलल्यावर मसाबाने पुन्हा अकदा पतीला किस केलं हे दृष्य पाहून अनेकांनी टाळ्या वाजवून त्यांचं आनंद व्यक्त केला. त्याशिवाय यांचा व्हिडिओ दजेखिल तुफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर काहींनी मसाबाला ट्रोल केलं आहे तर काहींनी त्यांच्यावर गमतीशीर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “एक काळ होता जेव्हा श्रीराम आपल्या वडिलांसाठी १४ वर्षं वनवासाला गेले होते. पण आज इथे वडिलांच्या समोर असं किस केलं जातंय. हेच कलियुग आहे. एवढंही मॉडर्न होऊ नका. थोडी लाज बाळगा.”, दुसऱ्या युजरने लिहिलं, “अह्हा.. भारतीय संस्कृती.” तर एका अन्यने लिहिले की, बाकी सगळं घरी जाऊन करा. इथेच सुरू होऊ नका” अशा कमेंट करत या व्हिडिओची गंमत घेतलील जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रखीवर सोळलाय दु:खाचा डोंगर! काही दिवसांपूर्वीच वडीलांच निधन आणि आता आई…, वाचा राखीच्या कुटुंबियांविषयी
“देशामध्ये फक्त सेक्स आणि शाहरुख खानच विकला जातो”, नेहा धुपियाचं विधान चर्चेत

हे देखील वाचा