कोरोना काळातही कमाईत ठरला हा सिनेमा ‘मास्टर’, पहिल्याच दिवशी चित्रपटाची बंपर ओपनिंग


नुकताच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थालापती विजय आणि विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका असणारा अ‍ॅक्शन-थ्रीलर चित्रपट ‘मास्टर’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ताबडतोड ओपनिंग केली आहे. प्राप्त माहितीनुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने संपूर्ण जगात ४० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

कोरोना काळातील ‘मास्टर’ हा पहिलाच चित्रपट आहे, ज्याला एवढी बंपर ओपनिंग मिळाली. मुख्य म्हणजे चित्रपटगृहांची क्षमता कोरोनामुळे ५० टक्के इतकीच असून देखील या सिनेमाने जोरदार कमाई केली आहे. लोकेश कानगराज दिग्दर्शित हा सिनेमा बुधवारी तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे एक्सजीबीटर विशेष चोहान यांनी सांगितले की, आम्हाला अपॆक्षा होती की, हा सिनेमा भारतात पहिल्या दिवशी २७/३० करोड पर्यंत कमाई करेल. मात्र हाच आकडा ४२ करोडपर्यंत गेला. सोबतच संपूर्ण जगाचा जर विचार केला तर या सिनेमाने ११ करोड कमावले. ही कमाई फक्त साऊथ भाषणामध्ये म्हणजेच तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाची आहे. हा चित्रपट आम्ही गुरुवारी हिंदीमध्ये सुद्धा प्रदर्शित केला आहे. त्यामुळे हिंदी व्हर्जनचे कलेक्शन आकडे अजून मिळाले नाहीये.

प्राप्त माहितीनुसार, मास्टर या चित्रपटाने तामिळनाडूत २३ कोटींहून अधिकची कमाई केली असून, केरळ आणि कर्नाटकात चित्रपटाचा प्रत्येकी ३,३ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ‘मास्टर’ने साडेचार कोटींपेक्षा जास्त कमाई केली. उर्वरित देशात दीड कोटींहून अधिकचा व्यवसाय चित्रपटाने केला आहे. यासोबतच मास्टरने ओवरसीज मार्केटमध्ये ४ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला.

मास्टरच्या धमाकेदार प्रदर्शनानंतर ट्रेंड एनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर लिहिले, “बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आली आहे. मास्टर या चित्रपटाने एक जबरदस्त सुरुवात केली आहे. प्रेक्षकांना जे पहायचे आहे ते तुम्ही द्या, प्रेक्षक कधीही तुम्हाला निराश करणार नाहीत. मोठ्या पडद्यावर उत्कृष्ट कलाकृती बघणे कधीच थांबणार नाही.’
या चित्रपटात विजय आणि विजय सेतुपती यांच्याव्यतिरिक्त मालविका मोहनन, शांतनु भाग्यराज, अर्जुन दास आणि नसीर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शक लोकेश कनागराज आणि सहलेखक रत्न कुमार यांनी या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.