‘अमीन हाजी’ हे बॉलिवूडमधील एक नावाजलेले दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये ‘लगान’, ‘1920’ या चित्रपटाचा समावेश होतो. त्याचा ‘कोई जाने ना’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘हर फॅन मौला’ या गाण्याचा टिजर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या टिजरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या गाण्यात एली अवराम आणि आमिर खान या दोघांच्या जबरदस्त डान्स स्टाईलने सगळ्यांना आकर्षित केले होते. आता हे संपूर्ण गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आहे आले. या गाण्यातील एली अवराम आणि आमिर खान यांचा रोमँटिक अंदाज आणि दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे.
हे गाणे आजच रिलीझ झाले असून या गाण्याला आत्तापर्यंत 1 कोटीपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. या गाण्याला टी- सीरिजच्या यूट्यूब चॅनलवरून अपलोड केले आहे. एलीने या गाण्याबद्दल तिच्या इंस्टाग्रामवरून माहिती दिली होती. याआधी या गाण्याच्या टिझरने सगळ्यांची उत्सुकता वाढवली होती.
या गाण्यात एली अवरामसोबत आमिर खानचे डान्स मुव्ह बघून कोणीच म्हणणार नाही की, तो 55 वर्षाचा आहे. त्यांच्या या डान्सने चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकवला आहे. एलीने देखील आपल्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने सगळ्यांना आकर्षित केले आहे. त्यांचे चाहते कमेंट करून दोघांचेही कौतुक करत आहेत.
या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहले आहेत. तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे, तर ‘जारा खान’ आणि ‘विशाल दादलानी’ यांनी हे गाणे गायले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘ग्रीक गॉड’ ऋतिक रोशनचे आलिशान घर पाहून तुम्हीही व्हाल थक्क, एकदा पाहाच
-खेसारी लालच्या ‘इश्क’ गाण्याची जादू आजही प्रेक्षकांवर कायम, मिळालेत २ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज
-बॅडमिंटन स्टार ‘सायना’च्या बायोपिकमध्ये परिणीती मुख्य भूमिकेत, ट्रेलरला मिळतंय भरभरून प्रेम