‘गॅरी’चा पर्दाफाश करत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने भावनिक पोस्ट केली शेअर

mazya navryachi bayko marathi popular show goes on off air actress shared emotional post see


‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने सन 2016 पासून प्रेक्षकांच्या मनात आपले घर निर्माण केले होते. शोमधील ‘गॅरी’ (गुरुनाथ सुभेदार), ‘शनाया’ व ‘राधिका’ या पात्रांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. संध्याकाळचे 6:30 वाजताच अवघा महिलावर्ग टीव्हीसमोर यायचा. मात्र, पाच वर्षांपासून मराठी वाहिनीवर राज्य करणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेची ‘गॅरी’चा पर्दाफाश करत सांगता झाली आहे. शोचा शेवटचा भाग 7 मार्च रोजी प्रसारित करण्यात आला होता.

शोने घेतलेल्या निरोपामुळे त्यातील कलाकार भाऊक होताना दिसले. शोमध्ये ‘राधिका सुभेदार’ ही भूमिका साकारणाऱ्या अनिता दाते- केळकरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या.

तिने लिहले, “मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते… आमचं टायटल साँग आज शेवटचं टीव्हीवर एपिसोडच्या सुरुवातीला लागलं. 22 ऑगस्ट 2016 ला सुरू झालेला हा माझ्या नवऱ्याची बायकोचा प्रवास आज संपतोय. सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. साडेचार वर्षांत तुम्ही प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं. कौतुक केलंत म्हणून हे शक्य झालं. या दिवसांनी कलाकार म्हणून मला खूप काही दिलं. नाव मिळालं. राधिका म्हणून ओळख मिळाली. अभिनेत्री म्हणून खूप काही शिकायला मिळालं. अनेक अनुभवांनी समृद्ध केलं. जीवाभावाचे मित्र-मैत्रिणी मिळाले, समजून घेणारे, चुकलो तर चूक दाखवून देणारे, कौतुक करणारे आणि शिव्या घालणारे. हे सगळं मी मिळवलं आहे. हे माझ्याकडे कायम असणार आहे.”

पडद्यावरील राधिका, शनाया आणि गुरुनाथ हे लोकप्रिय पात्र त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रत्येक घराघरात पोहोचले. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. सुरुवातीला मालिका टीआरपीच्या यादीत आघाडीवर होती, परंतु नंतर ती मूळ ट्रॅकपासून घसरली, ज्यामुळे प्रेक्षक निराश झाले. अहवालानुसार, कमी टीआरपी आणि अलीकडील भागांना मिळालेला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद यामुळे निर्मात्यांनी मालिका थांबवण्याचे ठरवले.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ हा दीर्घकाळ चालणार्‍या मराठी मालिकांपैकी एक आहे. कथेबद्दल बोलताना, ही कथा राधिका आणि गुरुनाथ यांच्या वैवाहिक जीवनावर आधारित होती. प्रत्येक नवीन भागासह, ही मालिका रोमांचक वळण घेत गेली. नाथ आणि राधिका विभक्त झाल्यानंतरही त्यांचा संघर्ष हा प्रत्येक चाहत्यासाठी जबरदस्त गप्पाटप्पाचा विषय बनला होता.

दुसरीकडे, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेची जागा ‘घातला वसा टाकू नको’ या नव्या मालिकेने घेतली आहे. हा एक आध्यात्मिक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना पौराणिक कथा पाहायला मिळतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कल्लूचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ, प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

-कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.