भोजपुरी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला स्टार ‘अरविंद अकेला कल्लू.’ आजकाल आपल्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे तो सर्वत्र चर्चचा विषय बनला आहे. 26 जुलै 1997 मध्ये त्याचा जन्म झाला होता. संगीतक्षेत्रात त्याने उत्तम कामगिरी निभावली. ‘लेसर फसर होली मैं’, ‘दिवानगी हद से’, ‘सखी बुलेटवा’ वाला यांसारखे त्याचे म्युझिक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. नुकतेच होळीनिम्मित त्याचे आणखी एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. त्या गाण्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
अरविंद कल्लूचे होळीनिमित्त ‘होई भतिजवा होली में’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रेक्षकांना एवढे आवडत आहे की, एका दिवसाच्या आत या गाण्याला 11 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे अरविंदनेच गायले आहे. या गाण्यात तो अत्यंत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
या गाण्यात असे दाखवले आहे की, कल्लू दिराच्या भूमिकेत कसा त्याच्या वहिनीसोबत होळी खेळत आहे. तो अत्यंत मजामस्ती करण्याच्या मूडमध्ये आहे. गाण्याचे बोल आर आर पंकज यांनी लिहले आहे. आर्या शर्मा यांनी संगीत दिले आहे. या गाण्याला सारेगामा हम भोजपुरीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे.
या व्हिडिओचे दिग्दर्शन आर्यन देव यांनी केले आहे. हे गाणे सगळ्यांना खूपच आवडत आहे. यूट्यूबवर या गाण्याला 16 हजारपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. अरविंदच्या या गाण्याला त्याच्या चाहत्यांकडून खूप प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
‘कल्लूचे हे गाणे एकदम झकास आहे. या होळीमध्ये हे गाणे माझ्या आवडीचे असणार आहे,’ अशी एका युजरने कमेंट केली आहे. याआधी देखील होळीची कल्लूने केलेली अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्या गाण्यांना देखील भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यामध्ये ‘देवरू हो डर लागे अच्छा रंग से’, ‘भगूआ मे भाभी फरिया’ या गाण्याचा समावेश होतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पटौदी घराण्याचा छोटा नवाब पुन्हा एकदा चर्चेत, गोंडस फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष
-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर