Saturday, July 27, 2024

दु:खद! अमिताभ बच्चन यांच्या लाडक्या मित्राचं निधन, बिग बींनी सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांना चित्रपट आणि अभिनयाची जितकी आवड आहे तितकेच ते त्यांच्या कुटुंबाच्याही जवळ आहेत. त्याचवेळी, बिग बींच्या घरातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. खुद्द बिग बींनी त्यांच्या सोशल हँडलवरून ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांशी शेअर केली आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आपले दु:ख व्यक्त करत आहेत.

अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या लेटेस्ट पोस्टनुसार, त्यांच्या लाडक्या कुत्र्याचे निधन झाले आहे. आपल्या लाडक्या कुत्र्याला गमावल्याने अभिनेता खूप दुःखी आहेत. आपले दु:ख व्यक्त करताना त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “आमचा एका छोटा मित्र, कामाचे हे क्षण मोठे होतात आणि मग एक दिवस निघून जातात.” अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर आपल्या लाडक्या कुत्र्याला गमावल्याची व्यथाही व्यक्त केली आहे. जिथे त्यांनी या दुःखद क्षणाला हृदय विदारक म्हटले आहे. त्यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, “हृदयद्रावक, पण जेव्हा ते आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा ते आपल्या जीवनाचे जीव आणि आत्मा असतात..!!” अमिताभ बच्चन यांच्या या दुख:च्या प्रसंगी चाहत्यांनीही त्यांना साथ दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

2013ला कुत्रा शानौकचा दुर्मिळ आजाराने मृत्यू
सगळ्यांनाच माहीत आहे की, बिग बी हे फॅमिली मॅन असण्यासोबतच डॉग लवर देखील आहेत. ते अनेकदा त्यांच्या पाळीव प्राण्यासाेबत फोटो शेअर करून त्यांचे कुत्र्यावरील प्रेम व्यक्त करत असे, ज्यावर त्यांना त्यांच्या चाहत्यांंचा भरभरुन कमेंटद्वारे प्रतिसाद मिळत असे. माध्यमातील वृत्तानुसार, याआधी जून 2013 मध्ये अमिताभ बच्चन यांचा लाडका कुत्रा शानौकचा दुर्मिळ आजाराने मृत्यू झाला. (bollywood actor amitabh bachchan pet dog dead big b shares a heartfelt post with a teary eyed emoji)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदित्य रॉय कपूरला डेट करतेय क्रिती सेनन? करण जोहरनेही सांगून टाकलं, ‘मी तुम्हाला कोपऱ्यात…’

प्रतीक्षा संपली! आलियाने आई झाल्यानंतर शेअर केला पहिला फाेटाे; चाहते म्हणाले, ‘बाळाचा फाेटाे…’

हे देखील वाचा