बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा शाहिद कपूर आज चाळीशीत पदार्पण करत आहे. २५ फेब्रुवारी १९८१ ला शाहिदचा मुंबईत जन्म झाला. बॅकग्राउंड डान्सर, सहायक भूमिकांपासून सुरु झालेला त्याचा प्रवास आज सुपरस्टारपर्यंत येऊन पोहचला आहे. अभिनयासोबतच उत्कृष्ट डान्सर असलेल्या शाहिदने अनेक सिनेमांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून डान्स केला.
पंकज कपूर आणि नीलिमा अजीम हे शाहिदचे आई, वडील. बालपणापासूनच शाहिद रोल, कॅमेरा, ऍक्शन या वातावरणात मोठा झाला. साहजिकच त्याचा ओढा या क्षेत्राकडे जास्त झाला. तसे पाहिले तर शाहिदचे बालपण अतिशय चढ उतारांनी भरलेले होते. शाहिद तीन वर्षाचा झाला आणि त्याच्या आई, वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याच्या आई, वडिलांनी पुन्हा संसार थाटला. आज ४० व्या वर्षी शाहिदला तीन आई आणि तीन वडील आहेत. आता तुम्ही म्हणाल कसे काय? या लेखातून आपण जाणून घेणार आहोत शाहिदच्या तीन आई आणि तीन वडिलांबद्दल.
पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांचे लग्न १९७५ साली झाले. त्यानंतर २५ फेब्रुवारी १९८१ साली शाहिदचा जन्म झाला. पाहिले तर पंकज कपूर आणि नीलिमा अजीम हे शाहिदचे बायोलॉजिकल (जन्मदाते) आई वडील आहे. मात्र १९८४ साली पंकज आणि नीलिमा यांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. शाहिद हा त्याच्या आईसोबतच होता. पुढे पंकज यांनी सुप्रिया पाठक यांच्यासोबत लग्न केले. पंकज कपूर व सुप्रिया पाठक यांना सना कपूर ही मुलगी आणि रुहन कपूर हा मुलगा आहे. सुप्रिया पाठक ह्या शाहिदच्या दुसऱ्या आई आहेत.
दुसरीकडे नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी लग्न केले. राजेश खट्टर हे शाहिदचे दुसरे वडील झाले. राजेश आणि नीलिमा यांना १९९५ साली ईशान नावाचा मुलगा झाला. मात्र २००१ मध्ये दुर्दैवाने नीलिमा आणि राजेश यांचे लग्न तुटले, आणि त्यांचा घटस्फोट झाला. ईशानने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ईशानने माजिद मजीदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली आहे. तो सैराटच्या हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मध्ये देखील झळकला.
नीलिमाने राजेश खट्टर यांच्याशी घटस्फोटानंतर उस्ताद रजा अली खान यांच्यासोबत तिसरे लग्न केले.या लग्नामुळे उस्ताद रजा अली खान हे शाहिदचे तिसरे वडील झाले. इथेही नीलिमा यांना दुःखच मिळाले कारण हे लग्न देखील जास्त काळ चालले नाही. नीलिमा आणि उस्ताद रजा यांचा पुढे घटस्फोट झाला.
काही दिवसांनी राजेश खट्टर यांनी अभिनेत्री वंदना सजनानी यांच्यासोबत लग्न केले. या नात्याने वंदना शाहिदच्या तिसऱ्या आई झाल्या.
शाहिदचे त्याच्या सर्व भाऊ, बहिणींसोबत आणि आई, वडिलांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहे. अनेकदा शाहिद त्याच्या परिवारासोबत कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतो.
महत्त्वाचे लेख
–ठरलं तर! ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार शाहिद कपूर, या निर्मात्यांसोबत करणार काम
–श्रीदेवी नव्हती देत बोनी कपूर यांना भाव, मग अशी लढवली शक्कल; आपल्यापेक्षा ८ वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत थाटला संसार
–बाप रे!! तीन-चार वेळा लग्न करणाऱ्या तारका, कुणी पटलं नाही म्हणून घेतला घटस्फोट तर कुणी...