Tuesday, July 1, 2025
Home हॉलीवूड रेड कार्पेटवर पाहायला मिळाली कलाकारांची जबरदस्त फॅशन; विचित्र ड्रेसमुळे किम कर्दाशियन ट्रोल

रेड कार्पेटवर पाहायला मिळाली कलाकारांची जबरदस्त फॅशन; विचित्र ड्रेसमुळे किम कर्दाशियन ट्रोल

मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी ‘मेट गाला’ हा फंड रेजिंग इव्हेंट आहे. हा इव्हेंट दरवर्षी न्यूयॉर्कमध्ये होतो. कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये हा कार्यक्रम होऊ शकला नाही. परंतु यावर्षी हा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. ‘मेट गाला’मध्ये कलाकारांच्या वेगवेगळ्या ड्रेस स्टाईल पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. ‘मेट गाला’ २०२१ चे आयोजन न्यूयॉर्कमध्ये शानदार पद्धतीने करण्यात आले आहे.

या खास प्रसंगी हॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्याचा जलवा दाखवला. ‘मेट गाला’च्या गुलाबी कार्पेटवर या अभिनेत्रींनी त्यांच्या वेगवेगळ्या फॅशन स्टाईलने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. जस्टिन बीबर आपल्या पत्नीसोबत ‘मेट गाला’ २०२१ च्या कार्यक्रमात पोहोचले. त्यावेळी किमने असे काही परिधान केले की, तिने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांचे फोटो दाखवणार आहोत, ज्यांनी ‘मेट गाला’मध्ये त्यांच्या फॅशननेे लोकांना त्यांच्याकडे आकर्षित केले.

किम कर्दाशियन
किम कर्दाशियनने ‘मेट गाला’ २०२१ मध्ये तिच्या पोशाखाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. यादरम्यान ती काळ्या रंगाच्या पोशाखात दिसली, ज्यात तिचा चेहरा देखील झाकलेला होता.

जीजी हदीद
जीजी हदीद आई झाल्यानंतर पहिल्यांदाच ‘मेट गाला’ २०२१ मध्ये दिसली. यादरम्यान तिने ऑफ व्हाईट गाऊन घातला होता.

जस्टिन बीबर- हेली बीबर
‘मेट गाला’ २०२१ मध्ये, जस्टिन बीबर पत्नी हेली बीबरसह कार्यक्रमाला पोहोचला होता.

कीवी सिंगर
कीवी सिंगरने मेट गाला २०२१ मध्ये पांढऱ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केला होता.

एरय्काह बदु
एरय्काह बदुने मेट गालामध्ये एक काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून डोक्यावर काळ्या रंगाचीच टोपी घातली होती.

हंटर शेफर
हंटर शेफरने मेट गालामध्ये सिल्वर रंगाचा क्रॉप टॉप आणि लाँग स्कर्ट परिधान केला होता.

विनी हार्लो
विनी हार्लोने मेट गालामध्ये एक वेगळ्या फॅशनचा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

सेरेना विलियम्स
सेरेना विलियम्सने मेट गालामध्ये गुलाबी, पांढरा आणि काळ्या रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला होता.

ईमान हम्माम
ईमान हम्मामने मेट गालामध्ये पांढऱ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती खूप हॉट दिसत होती.

किम पेट्रास
किम पेट्रास मेट गालामध्ये एका वेगळ्याच लूकमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. तिने मरून रंगाच्या एका प्राण्याच्या आकाराचा ड्रेस परिधान केला होता. त्यासह तिने हेअरस्टाईल देखील प्राण्याच्या आकाराचा ड्रेसला मॅच होईल अशी केली होता.

सिमोन बाइल्स
सिमोन बाइल्सने मेट गालामध्ये पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

तेयाना टेलर
तेयाना टेलरने मेट गालामध्ये राखाडी (ग्रे) रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती खूप ग्लॅमरस अंदाजात दिसत होता.

https://twitter.com/NewzBreakk/status/1437574192124342276

रिहाना

रिहानाने मेट गालामध्ये काळ्या रंगाचा डोक्यापासून ते पायापर्यंत लाँग ड्रेस परिधान केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयासह आयुष्मानने गिरवलेत पत्रकारितेचेही धडे; तर ‘हे’ आहे अभिनेत्याचं खरं नाव

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट

-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत

हे देखील वाचा