Sunday, May 19, 2024

अरे वाह! ‘पिंजरा खूबसुरती का’ फेम साहिल उप्पल ‘या’ लेखिकेसाेबत अडकणार लग्न बंधनात

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय मालिका ‘पिंजरा खूबसूरती का’ यातून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता साहिल उप्पल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. साहिल स्टार प्लसची लोकप्रिय मालिका ‘इमली‘ याची लेखिका आकृती अत्रेजा हिच्यासोबत जयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची बातमी आहे. या जोडप्याचे लग्न 8 डिसेंबरला हाेणार आहे.

माध्यमाशी बोलताना, अभिनेता साहिल (Saahil Uppal) याने त्याच्या लग्नाबद्दल आणि त्याच्या लव्ह स्टाेरीबद्दल सांगितले. माध्यमातील वृत्तानुसार, आपल्या प्रेमकथेबद्दल सांगताना साहिल म्हणाला, “प्रेम स्वतःच घडते. आमची ओळख सहा वर्षापूर्वी माझ्या फ्लॅटमेट्सनी करुन दिली होती, जे माझे कॉलेजचे मित्र होते. आमच्या नात्याचा सर्वाेत्तम भाग म्हणजे आम्ही लगेच एकमेकांत मिसळलो आणि चांगले मित्र बनलो त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या स्वभावाव्यतिरिक्त, आकृती (Aakriti Atreja) खूप क्रिएटिव आहे आणि यामुळेच मी तिच्याकडे सर्वात जास्त आकर्षित झालाे. तिने दिग्दर्शनाचा कोर्सही केला आहे.”

पुढे बोलताना साहिलने सांगितले की, “त्याने त्याच्या लग्नासाठी जयपूरची निवड केली. कारण दोघांना डेस्टिनेशन वेडिंग करायचे होते.” साहिल म्हणतो की, त्याचे कुटुंब खूप मोठे आहे आणि प्रत्येकाला गोव्यासारख्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते, म्हणून त्याला होमटाऊन, दिल्लीहून जयपूर हे सर्वात योग्य आणि खास ठिकाण वाटले.” साहिलने पुढे खुलासा केला की, “डेस्टिनेशन वेडिंगनंतर लवकरच ताे मुंबईत आपल्या इंडस्ट्रीतील मित्रांसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहे.”

लेखिका आकृती अतेरेजा हिने ‘इमली’ व्यतिरिक्त ‘नागमणी’, ‘सिंदूर की कीमत’ यासारख्या दमदार टीव्ही मालिकेचे लेखन केले आहे. तर साहिलने ‘पिया अलबेला’, ‘महारक्षक देवी’, ‘होली बॉन्ड’,’जीत गई तो पिया मोर’ ‘ब्रह्मराक्षसांनी सैतानला जागे केले’, ‘शक्ती अस्तित्व के एहसास’, ‘एक शृंगार स्वाभिमान’, ‘जीत गई तो पिया मोर’ या दमदार मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची छाप साेडून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. ( pinjara khubsurti ka fame saahil uppal is all set to tie a knot with imlie writer aakriti atreja)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! कपिलचा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला विकतोय शेंगदाणे

‘सेल्फी विद पीएम मोदी;’ म्हणत तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सुंदरच्या पोस्टने वेधले लक्ष

हे देखील वाचा