Monday, April 21, 2025
Home टेलिव्हिजन मिका सिंगपूर्वी ‘या’ कलाकारांनी रचवलाय स्वयंवर, पण टिकू शकलं नाही एकाचंही नातं!

मिका सिंगपूर्वी ‘या’ कलाकारांनी रचवलाय स्वयंवर, पण टिकू शकलं नाही एकाचंही नातं!

टीव्हीवर पुन्हा एकदा लग्नासाठी जोडीदार शोधण्याचा कार्यक्रम रंगणार आहे. आता प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) आपल्या पत्नीच्या शोधात टीव्हीवर दिसणार आहे. मिका सिंग टेलिव्हिजनवर स्वयंवर करताना दिसणार आहे. टीव्हीवर जोडीदार शोधण्याची प्रक्रिया राखी सावंतच्या स्वयंवरपासून सुरू झाली. राखीच्या स्वयंवरसाठी १६ मुलांना एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. जिथे वेगवेगळ्या परीक्षा देऊन या मुलांची निवड होणार होती. त्याचवेळी सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलाला राखीने पुष्पहार घातला होता.

राखी सावंत (Rakhi Sawant)
साल २००९ मध्ये, राखी सावंतने स्वयंवरमध्ये इलेश पारुजनवालाला तिचा जोडीदार म्हणून निवडले. अभिनेत्रीने इलेशशी लग्न केले नाही, परंतु त्यांनी अनेक कार्यक्रमात एकत्र भाग घेतला. एकत्र राहिल्यानंतर राखी आणि इलेशमध्ये वाद होऊ लागल्याने दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

राहुल महाजन (Rahul Mahajan)
साल २००९मध्ये पुन्हा राहुल महाजनचा स्वयंवर आला. ‘राहुल दुल्हनिया ले जायेगा’ या कार्यक्रमात १४ मुलींनी भाग घेतला होता. ज्यामध्ये खूप ड्रामा पाहायला मिळाला. शो संपेपर्यंत राहुल महाजनने डिंपी गांगुलीची जोडीदार म्हणून निवड केली. राहुलनेही डिंपीशी लग्न केले, पण चार वर्षांनी दोघेही वेगळे झाले.

रतन राजपूत (Ratan Rajpoot)
टीव्ही अभिनेत्री रतन राजपूतनेही स्वयंवर केल्यानंतर लग्न केले. ‘रतन का रिश्ता’ या शोमध्ये १४ मुलांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये रतनने आपला जोडीदार म्हणून अभिनव या मुलाची निवड केली. शोमध्ये रतन आणि अभिनवचा साखरपुडा झाला पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

शहनाज गिल आणि पारस छाबरा (Shahnaz Gill and Paras Chhabra) : सर्वांच्या आवडत्या शहनाज गिल आणि पारस छाबरा यांनी टीव्हीवर एक स्वयंवर केला. या कार्यक्रमात शहनाज आणि पारस स्वतःसाठी जोडीदार शोधण्यासाठी गेले होते. शहनाजने मध्येच हा कार्यक्रम सोडला. रिपोर्ट्सनुसार, शहनाज सिद्धार्थच्या प्रेमात होती. म्हणूनच तिने हा कार्यक्रम सोडला. शहनाज गेल्यानंतर तिच्या जागी आंचल खुराना आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा