हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक कथांवर चित्रपट तयार करण्यात आले आहेत, ज्यामध्ये देव, अंधश्रद्धा यांवर अनेक उघडपणे भाष्य करण्यात आले आहे. अशा गोष्टींचा थेट विरोध करण्यात आला आहे. मात्र तुम्हाला ऐकूण धक्का बसेल की चित्रपट जगतात असे अनेक कलाकार आणि अभिनेते आहेत जे अशा गोष्टी मानतात. आपल्या यशात अशाच गोष्टींमुळे भर पडली आहे अशी त्यांची श्रद्धा असते. तसेच या गोष्टी, माळ, दोरे, ते सतत सोबत ठेवत असतात. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
हिंदी चित्रपट जगतातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा या यादीत सर्वप्रथम समावेश होतो. अमिताभ बच्चन यांनी चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ९०च्या काळात ते यशाच्या शिखरावर होते. त्यांचा हा यशस्वी प्रवास २००० पर्यंत चालला. मात्र त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली, त्यांच्यावर या काळात मोठे कर्ज झाले. यादरम्यान त्यांना कोणीतरी निळी माळ घालण्याचा सल्ला दिला होता. यानंतर त्यांची सगळी संकटे दूर झाल्याचे ते सांगतात.
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)
महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणेच त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनही अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवतो. अभिषेक बच्चन आपल्यावरील संकटे दूर व्हावीत म्हणून निलमाळ घालतो. सध्या अभिषेक त्याच्या करिअरमध्ये संघर्ष करताना दिसत आहे.
सलमान खान (Salman Khan)
अभिनेता सलमान खानच्या हातात दिसणारे ब्रेसलेट तर सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात हे ब्रेसलेट हातात दिसून येते. सलमान खानला हे ब्रेसलेट त्याच्या वडीलांनी दिले आहे. जे त्याच्यासाठी खूपच लकी आहे असे तो मानतो. हे ब्रेसलेट त्याला सकारात्मक उर्जा देते अशी त्याची भावना आहे.
शाहरुख खान (Shahrukh Khan)
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही अशा गोष्टींना खूप मानतो. तो आपल्या हातात नेहमीच कडे घालतो. त्याच्या करिअरसाठी ते खूपच लकी आहे असे तो म्हणतो. आता लवकरच शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एकता कपूर (Ekta Kapoor)
टिव्हीवरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूरही अशा प्रकारच्या गंड्या दोऱ्यांवर प्रचंड विश्वास ठेवते. यामुळेच तिच्या हातात नेहमी अनेक अंगठ्या, दोरे दिसतात. सध्या एकता कपूरच्या लॉकअपची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
संजय दत्त (Sanjay Dutt)
अभिनेता संजय दत्त नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतो. त्याचप्रमाणे संजय दत्तही अशा हिरे आणि गंडेदोऱ्यांवर विश्वास ठेवत असतो. त्यामुळेच त्याच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत असे त्याची भावना आहे.
अजय देवगण (Ajay Devgn)
अभिनेता अजय देवगणही ज्योतिषशास्त्र आणि गंडे दोऱ्यांवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या यादीत आहे. इतर कलाकारांप्रमाणे अजय देवगण आपल्यावरील संकटे टळण्यासाठी हातात अंगठ्या घालतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-










