Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुसळधार पावसात रात्री ३ वाजता मिकाची गाडी पडली बंद; सोबत बसलेल्या ‘या’ अभिनेत्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे गुपीत उघड

बऱ्याचदा सामान्य लोकांना प्रश्न पडतात की, आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा सामना आपल्या दैनंदिन आयुष्यात करतो, तसाच सेलेब्रिटी देखील करत असतील का? या प्रश्नाचे उत्तम उत्तर नुकतेच सर्वांना मिळाले आहे. आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला गायक म्हणजेच मिका सिंग. एक से बढकर एक गाणी गाणारा, भारदस्त आवाजाचा आणि मस्तमौला गायक म्हणून मिका नेहमीच ओळखला जातो. मात्र, नुकताच मिका मुंबईकरांच्या मदतीमुळे एका अडचणीतून बाहेर पडला. या अडचणीमुळे मिकाची एक गोष्ट उघड झाली आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या रिसेप्शन पार्टीवरून तो घरी परतत होता. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्ते पाण्याने भरले आहेत. पावसात मिका सिंगची गाडी बंद पडली आणि तो मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास रस्त्यात अडकला. मिकाच्या मदतीसाठी अनेक मुंबईकर भर पावसात रस्त्यावर जमले. जवळपास २०० लोकांनी मिकाची मदत केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे एक गुपीत बाहेर आले आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मिकासोबत त्याच्या ‘हमर’ गाडीत एक अभिनेत्री देखील दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती ‘बिग बॉस’चा स्पर्धक राहिलेल्या पारस छाबराची एक्स गर्लफ्रेंड आकांशा पुरी आहे.

या व्हिडिओमध्ये मिका सिंग एका ठिकाणी इशारा करत सांगत आहे की, “तिथे आमची गाडी खराब झाली होती. कमीतकमी २०० लोकं आमच्या मदतीसाठी आले. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता.” या व्हिडिओमध्ये लोकांचा देखील मोठा आवाज ऐकू येत असून, लोकं मीकाच्या नावाने ओरडत आहेत.

मागील काही दिवसांपासून मिका आणि आकांशा मीडियामध्ये चांगलेच गाजत आहेत. एका म्युझिक व्हिडिओच्या कारणामुळे या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली असल्याचे दिसत आहे. मात्र, याबाबत दोघांकडून कोणतीच अधिकृत माहिती आली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जस्टिन बिबरचे चालते फिरते घर पाहिले का? दिग्गज कलाकारांच्या बंगल्यालाही टक्कर देईल त्याची आलिशान बस

-‘असं चोरी करणं बरोबर दिसतं का?’ शालूच्या लेटेस्ट व्हिडिओवर युजरची लक्षवेधी कमेंट आली चर्चेत

-‘यू आर परफेक्ट’ गाण्यावर रुबीना दिलैकने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून चाहतेही झाले इम्प्रेस

हे देखील वाचा