‘यू आर परफेक्ट’ गाण्यावर रुबीना दिलैकने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून चाहतेही झाले इम्प्रेस


‘बिग बॉस 14’ ची विजेती स्पर्धक आणि प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक ही नेहमीच सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनते. वैयक्तिक अथवा व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहमीच तिच्याबद्दल चर्चा चाललेल्या असतात. रुबीनाचे नुकतेच काही दिवसांपूर्वी एक गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यात ती ‘बिग बॉस 13’ फेम पारस छाबडा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. रुबीना सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

रुबीनाने रविवारी (१७जुलै) रात्री हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘यू आर परफेक्ट’ या ट्रेडिंग गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. तिने यामध्ये लाईट ग्रे कलरचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच ज्वेलरी देखील घातली आहे. ती या गाण्यावर खूप छान हावभाव करून डान्स करताना दिसत आहे. (Rubina dilaik dance on You are perfect song, video viral on social media)

तिचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. तिचा हा डान्स व्हिडिओ पाहून तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत.

यासोबतच चाहत्यांसाठी तिने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. रुबीना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या या चित्रपटात तिच्या सोबत हितेन तेजवानी आणि राजपाल यादव असणार आहेत.

रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाचे ‘मरजानिया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.