‘असं चोरी करणं बरोबर दिसतं का?’ शालूच्या लेटेस्ट व्हिडिओवर युजरची लक्षवेधी कमेंट आली चर्चेत


राजेश्वरी खरात तिच्या अभिनयापेक्षा अधिक तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटाद्वारे शालू अर्थातच, राजेश्वरी खरातने आपली विशेष ओळख निर्माण केली. चित्रपटात शालू जितकी गाजली तितकीच ती सोशल मीडिया प्रसिद्ध असल्याचे दिसते. शालू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. तिचे हे व्हिडिओ चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.

पुन्हा राजेश्वरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात चाहत्यांना पुन्हा तिचा भुरळ पाडणारा अंदाज पाहायला मिळाला आहे. तुम्ही पाहू शकता की, यात राजेश्वरीने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे, ज्यात ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘चुरा के दिल’ या गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. या व्हिडिओमधील शालूच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत. (rajeshwari kharat shared video on chura ke dil tera goriya chali)

हा व्हिडिओ शेअर करत, राजेश्वरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “गोरीया चली…” व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल व्हायला लागला होता. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. चाहते देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने तर लिहिलंय की, “असं चोरी करणं बरोबर दिसतं का.” व्हिडिओसोबतच या कमेंटने देखील अनेकांचं लक्ष वेधलं आहे. शिवाय यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत ३२ हजाराहून अधिक युजर्सने हा व्हिडिओ पाहिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.