राखी सावंतपाठोपाठ आता मिका सिंगचाही शिल्पा शेट्टीच्या पतीला पाठिंबा; म्हणाला, ‘मी ऍप पाहिले होते…’


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रांचने अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन ऍपद्वारे पब्लिश केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले आहे. तोच मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यानंतर बॉलिवूड गायक मिका सिंग याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितले की, राज कुंद्राच्या ऍपमधील एक व्हिडिओ त्याने पहिला आहे.

अश्लील चित्रपट बनवण्यात राज कुंद्राचे नाव समोर आल्यावर मिका सिंगने राजला पाठिंबा देत पॅपराजींसोबत बोलताना राज एक ‘चांगला व्यक्ती’ असल्याचे सांगितले. त्याने सांगितले की, त्याला या ऍपबाबत जास्त काही माहिती नाहीये, पण त्याने राजचे इतर काही ऍप पाहिले होते. त्याने सांगितले की, तो एक साधा ऍप होता त्यात जास्त काही नव्हते. त्यामुळे सगळं काही चांगलं होईल अशी त्याला आशा आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, रिपु सुडान बालकृष्ण कुंद्रा उर्फ राज कुंद्राने यूकेमध्ये असलेली एक कंपनी केनरिन प्रायव्हेट लिमिटेडला हा ऍप विकला होता. याची सगळी जबाबदारी प्रदीप बक्शीकडे होती. तो केवळ मुंबईमधून सगळ्या गोष्टींचे नियंत्रण करत होता.

क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, राज कुंद्राने त्याच्या या बिझनेसमध्ये 10 कोटी रुपये गुंतवले होते. खरं तर फेब्रुवारी महिन्यातच या गोष्टीची माहिती मिळाली होती की, राज कुंद्राच्या कंपनीचा या सगळ्यांशी काहीतरी संबंध आहे. पण आता तसा ठोस पुरावा मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. (Mika Singh react on Raj Kundra pronographic films case reveal he has seen one of the app)

मिका सिंगपूर्वी राखी सावंतनेही राज कुंद्राला पाठिंबा दर्शवला होता. राजला अटक झाल्यानंतर मुंबईमध्ये राखीला मीडियाने राज आणि शिल्पाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, “शिल्पाने आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये खूप मेहनत करत यश मिळवले आहे. त्याचे नाव खराब करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या परिवारात दखल देत त्यांना बदनाम केले जात आहे. माझा विश्वासच नाही राज कुंद्रा असे काही करू शकतो. राज एक चांगला व्यक्ती आहे. तो एक उद्योगपती असण्यासोबतच शिल्पाचा नवरा आहे. कोणीतरी त्याला ब्लॅकमेल करत असून, त्यांचे आणि शिल्पाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना शांततेत जगू द्या. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, याची तरी लाज बाळगा. हसत्या खेळत्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये केलेल्या तपासावरून हे समोर आले होते की, राज कुंद्राची कंपनी काही छोट्या कलाकारांना वेबसीरिजमध्ये तसेच शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्यासाठी लोभ दाखवत होती. त्यानंतर त्यांच्याकडून ऑडिशनच्या नावाखाली काही शॉट्स करून घेतले जात होते. यामध्ये ते कलाकारांना तुम्हाला थोडा बोल्ड सीन करावा लागेल, असे सांगायचे. ते जवळपास त्यांना सेमी न्यूड आणि पूर्ण न्यूड व्हायला सांगायचे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला सीआयडीच्या ‘अभिजीत’ने मिळवून दिली घराघरात ओळख

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.