Monday, April 21, 2025
Home मराठी मिलिंद गुणाजी यांच्या लेकाचे लग्न झाले थाटात पार, गुणाजी कुटुंबाचे फोटो झाले व्हायरल

मिलिंद गुणाजी यांच्या लेकाचे लग्न झाले थाटात पार, गुणाजी कुटुंबाचे फोटो झाले व्हायरल

अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून घराघरात पोहचलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गुणाजी होय. त्यांनी मराठी तसेच अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच त्यांनी तमिळ आणि तेलुगू चित्रपटात देखील काम केले आहे. नुकतेच त्यांच्या मुलाचे लग्न पार पडले आहे. त्यांना अभिषेक नावाचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या भावी पत्नीचे नाव राधा पाटील हे आहे. अभिषेक हा देखील चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. त्याच्या लग्नाची बातमी आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिषेक आणि राधा मागील अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये होते. अशातच त्यांनी घरच्यांच्या परवानगीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच त्यांचा लग्न सोहळा झाला आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ते दोघेही पारंपारिक वेशात दिसत आहेत. अभिषेकने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे, तर त्याची पत्नी राधा हिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यांच्या कुटुंबाचा देखील एक फोटो समोर आला आहे. (Milind gunaji’s son Abhishek gunaji get married)

अनेकजण या फोटोवर कमेंट करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. काही दिवसापूर्वी जेव्हा त्यांचा साखरपुडा झाला होता, तेव्हा देखील त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये त्यांचे कुटुंब खूप खुश दिसत आहे.

अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ‘छल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात त्याचे वडील मिलिंद गुणाजी आणि सुमित राघवन हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते. तसेच अनेक जाहिरातींचे देखील दिग्दर्शन केले आहे. यासोबतच त्याने ‘आपलं कर्जत जामखेड’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

त्याचे वडील मिलिंद गुणाजी हे चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘पानिपत’, ‘रेस ३’, ‘ऑक्सिजन’, ‘बाबू जी एक तिकीट मुंबई’, ‘प्रेम कहाणी एक लपलेली गोष्ट’, ‘कौल मनाचा’, ‘लेक लाडकी’, ‘सांभा’, ‘एक शोध’, ‘लागली पैंंज’, ‘यह मेरा इंडिया’, ‘ब्लॅक अँड व्हाईट’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

‘इंडियन आयडल’ फेम पवनदीप अन् अरुणिताने गुपचूप केले लग्न? फोटो आले समोर

‘माझी कहाणी फक्त मलाच माहित’, म्हणत रुपाली भोसलेने केला तिचा सुंदर लूक शेअर

‘अंगात आलया’ गाण्यावर ‘झोंबिवली’ कलाकारांनी धरला ठेका, सिद्धूची एनर्जी पाहून हरपेल तुमचेही भान

 

हे देखील वाचा